shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय जनता पक्ष हा पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारावर आधारित...!


सामोडे :- भारतीय जनता पक्ष हा पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित आहे .आज पक्ष ज्या उंचीवर पोहचला आहे, त्याचे सर्व श्रेयकार्यकर्त्याच्या अधिष्ठीत स्थानामुळे असून ही विचारधारा पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या आग्रही विचारधारेचा हा प्रभाव असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.संभाजीराव पगारे यांनी  येथील स्वामी विवेकानंद वाचनालयाच्या सभागृहात सेवा व समर्पण पंधरवडा आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात यांनी कार्यक्र्त्यासमोर बोलताना केले . याप्रसंगी मंडलाध्यक्ष इंजि मोहन सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे,  जेष्ठ कार्यकर्ते ईश्वर बोरसे, श्रीमती वैशाली अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.  

याप्रसंगी  भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते व जेष्ठ पदाधिकारी यांचा सन्मानपत्र, सन्मान चिन्ह. शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित व कृतज्ञता भाव व्यक्त करण्यात आला. अॅड संभाजीराव पगारे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,  पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या मूल्यवान विचारांमुळे भाजप जिवंत असल्याचे सांगत भाजपाला शामा मुखर्जी व पंडित दीनदयाल उपाध्याय हे राम कृष्ण म्हणून देण आहे. आदर्श मानवतावादी मूल्ये देत राष्ट्रभक्तीचा वास्तूपाठ त्यांच्या कार्यातून देशाला मिळाला असला तरी काही विरोधी शक्तीनी हा आदर्श इतिहास व चरित्र जगासमोर येऊ दिला नाही असा रोष व्यक्त करीत संघर्षातून भाजपा या उंचीवर पोहचला असून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित पक्ष संघटन व पक्ष हा  कार्यकर्ता अधिष्ठीत असल्याचा हा विजय आहे असे ही शेवटी त्यांनी सांगितले . यावेळी वसंतराव बच्छाव  व ईश्वर बोरसे यांनी ही मनोगतं व्यक्त केली. याप्रसंगी संभाजीराव पगारे हे अध्यक्षस्थानी होते.  प्रदीप कोठावदे, वसंतराव बच्छाव,विजय नंदन,ईश्वर बोरसे, उत्तम खैरनार, श्रीमती अहिरे, हभप.अण्णा  नेरकर यांच्या हस्ते सन्मान पत्र व चिन्ह देण्यात आले.
          यावेळी कार्यक्रमात जेष्ठ कार्यकर्ते मधुकर भामरे, अनिल मुसळे, आनंदा चौधरी, नितीन कोतकर, प्रमोद गांगुर्डे,  अनिल जाधव, गजानन कोतकर,  चंदू कोठावदे,  जगदीश धामणे, सुरेश पुराणिक , रवींद्र कोतकर, दिलीप घरटे, दादाजी सोनवणे, प्रकाश अहिरराव,  शेखर बाविस्कर, राजेन्द्र एखंडे,  अनिल कोठावदे,  सुनील कोठावदे,  मधुकर धामणे, बापू मालचे,लालखाॅ पठाण,  संजय कोठावदे, प्रतिक कोतकर,  योगेश बधान,भटू निकम,विठ्ठल पगारे, रवींद्र भावसार,  सुदाम कोठावदे, अंबादास चव्हाण, सुरेश जगदाळे, वासुदेव धामणे, जाकीर खाटीक,दराणेकर रामकृष्ण,डाॅ. अन्सारी, संतोष भामरे, हेमराज दशपुते, छाया वाडेकर, वैशाली अहिरे आदी उपस्थित होते.                 

          वसंतराव बच्छाव यांनी सांगितले की, एकात्म मानवतावादी विचारधारा पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिली पक्ष संघटन करून प्रेरणास्रोत आहे. सामान्यातून असामान्य कार्य केले.सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रमोद गांगुर्डे यांनी केले तर आभारप्रदर्शन शहराध्यक्ष नितीन कोतकर यांनी केले.
close