shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार संतोष बांगर यांचे ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला बोल...!

अमरावती:-
शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात सर्वांत शेवटी आलेले आमदार संतोष बांगर नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून वादग्रस्त राहिले आहेत.


आज अमरावतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांकडून हल्ला झाल्याची बातमी ताजी असतानाच आज अमरावतीतदेखील तशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं चित्र आहे. पण यावेळी शिवसैनिकांनी उदय सामंत नाही तर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्लाबोल केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शिवसैनिकांनी बांगर यांची गाडी अडवत 50 खोक्के एकदम ओक्के अशी घोषणाबाजी केली.

आमदार संतोष बांगर आज अंजनगांव सुर्जी येथील मठातून दर्शन करुन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी हल्लाबोल करित "पन्नास खोके एकदम ओके" चे नारे दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. आमदार संतोष बांगर हे शिवसेनेतून सर्वात शेवटी शिंदे गटातसामिल होणारे आमदार होते.एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचेसोबत राहाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र अचानक दुसरे दिवशी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. याचा राग शिवसैनिकांना असल्यामुळेच  हे आजचे प्रकरण घडल्याचे बोलले जात आहे.
close