कोपरगाव नगरपालिकेने शहरातील नागरिकांना दिलेल्या अवास्तव वाढीव करपट्टी विरोधात आज भाजपा, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) व मालत्ताधारक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाशेजारी साखळी उपोषण सुरू केले आहे....
कोपरगाव : September 27, 2022
कोपरगाव नगरपालिकेने शहरातील नागरिकांना दिलेल्या अवास्तव वाढीव करपट्टी विरोधात आज भाजपा, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) व मालत्ताधारक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाशेजारी साखळी उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणस्थळी बोलताना नागरिकांच्या दृष्टीने पालिकेने घेतलेल्या जुलमी निर्णयाला तीव्र शब्दात विरोध दर्शवत ही अवास्तव पट्टी रद्द करावी अन्यथा यापेक्षा तीव्र भूमिका घ्यावी लागेल असे मत मांडले व जोपर्यंत ही ४०% करवाढ रद्द होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील अशी भूमिका घेतली.
नगरपालिका मुख्याधिकारी यांनी एखाद्या विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्यासारखा कारभार चालवला असून त्यांच्या कार्यकाळात अनेक भूमिका संशयास्पद असल्याने तातडीने मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे व विविध विषयात त्यांची चौकशी व्हावी असा हल्लाबोलही केला.
पाच वाजल्यानंतर ठेकेदार घेऊन बसणे, शहरातील रस्त्यांची निकृष्ट कामे करून त्यात गैरव्यवहार करणे, पाणी प्रश्नात असलेली संशयास्पद भूमिका अशी विविध कृत्य बाहेर आली आहेत. मुख्याधिकारी हे जणू नागरिकांना लुटून स्वहित साधण्यासाठी आणि काही राजकिय व्यक्तींना खुश करण्यासाठी खुर्चीवर बसले आहेत का? असा खडा सवालही यावेळी उपस्थित केला.
मालमत्ता धारकांना आकारण्यात आलेली ही अन्यायकारक करवाढ रद्द व्हावी तोपर्यंत आमची लढाई सुरूच असेल असा इशारा प्रशासनाला दिला. तसेच कोरोना काळातील घरपट्टी माफ करण्यात यावी अशी देखील मागणी या दरम्यान केली.
विरोधकांनी केवळ हाणामारीच्या गोष्टी न करता विकासाच्या मुद्यावर समोरा समोर येण्याची तयारी दाखवावी, आम्ही दूध का दूध पाणी का पाणी करण्यास तयार आहोत असे बोल यावेळी सुनावले.
याप्रसंगी श्री शरदनाना थोरात, श्री संजयराव सातभाई,श्री परागजी संधान, श्री केशवराव भवर, श्री विजयराव आढाव,श्री नारायण अग्रवाल, श्री डि. आर. काले, श्री राजेंद्र बागुल, श्री सत्येन मुंदडा, श्री आर डी सोनवणे, श्री बबलू शेठ वाणी,श्री जितेंद्र रनशुर, श्री योगेश बागुल, श्री कैलास जाधव, श्री बाळासाहेब नरोडे, श्री रविद्र पाठक, श्री विजयराव वाजे, श्री किरण सूर्यवंशी, श्री राहुल सुर्यवंशी, श्री स्वप्निल निखाडे, श्री किरण सुपेकर, श्री जनार्दन कदम, श्री अतुलशेठ काले, श्री विनोद राक्षे, श्री बाळासाहेब आढाव, श्री महावीर दगडे, श्री कैलास खैरे, श्री पिंकी चोपडा, श्री दादाभाऊ नाईकवाडे,श्री वैभव आढाव,श्री अविनाश पाठक, श्री बाळासाहेब राउत, श्री शिवाजी खांडेकर, श्री गोपी गायकवाड, श्री विजय चव्हाणके, श्री सागर जाधव,श्री गोपी सोनवणे, श्री खालिकभाई कुरेशी, श्री संजय पवार, श्री सतिष रानोडे,, श्री दिपक जपे, श्री फिरोज पठाण, श्री सतिष चव्हाण, श्री अर्जुन मोरे, श्री संतोष साबळे, श्री संदीप देवकर, श्री अशोक लकारे, श्री सोमनाथ म्हस्के, श्री रविंद्र रोहमारे, श्री चंद्रकांत वाघमारे, श्री संतोष नेरे, श्री शामराव आहेर, श्री संजय जगदाळे, श्री महेश गोसावी, श्री इलियास खाटीक, श्री विकी मंजुळ, श्री रोहीत कणगरे, श्री वासुदेव शिंदे, श्री शुभम वाजे, श्री प्रतिक मेहरे, श्री शंकर बिऱ्हाडे, श्री स्वराज सुर्यवंशी, श्री सोमनाथ आहीरे, श्री इलियास शेख, श्री सलीम इंदुरी, श्री पंकज मोरे, श्री अमोल बागुल, श्री बाबासाहेब साळुंके, श्री वैभव सोळसे, श्री जॉन गोरे, श्री साई नरोडे, शैलेश नागरे, श्री अन्सारभाई शेख, श्री संदीप निरभुवने, श्री सचिन त्रिभुवन, श्री स्वप्निल कडू, श्री मुक्तार शेख, श्री हुसैनभाई सय्यद, श्री देवराम पगारे, श्री रविंद्र नरोडे, श्री हसेनभाई पटेल, श्री मुकुंद उदावंत, सौ वैशालीताई आढाव, सौ शिल्पाताई रोहमारे, सौ अनिताताई साळवे, सौ विद्याताई सोनवणे, सौ दिपाताई गिरमे, सौ हर्षाताई कांबळे, सौ सुवर्णाताई सोनवणे, श्रीमती ताराबाई जपे आदी उस्थित होते.

