शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रवीवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२
'चंद्रा' फेम जयेश खरेच्या कौतुकासाठी चाहत्यांची गर्दी..!!
सोनई : जयेश विश्वास खरे या सहावीतील विद्यार्थ्याचे "आली तारांगणी ही चंद्रा" या गीताने सोशलमिडीयावर धमाका केल्यानंतर आता त्याच्या भेटी व सत्कारासाठी वांजोळपोही गावात चाहते येवू लागले आहेत.रात्रीतून लाखो कमेंट घेतलेल्या चिमुकल्याचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
करजगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात जयेश सहावीचे शिक्षण घेत आहे.चार दिवसापूर्वी शिक्षक कृष्णा राठोड यांनी जयेशने वर्गात गायलेल्या चंद्रा लावणीचा व्हिडीओ काढून फेसबुकवर टाकला आणि काही तासात या गाण्यास लाखो लाइक मिळाल्या.सोशलमिडीयावर धमाका करणारा जयेश खरे अतिशय गरीब कुटुंबातील असुन वडील विश्वास खरे ऑर्क्रेस्ट्रात हार्मोनियम वादक तर आई प्रमिला मोलमजुरी करते.ते राहत असलेल्या पत्र्याच्या दोन लहान खोलीत तीन दिवसापासून वर्दळ वाढली आहे.
जयेशच्या भेटीला इलेक्ट्रॉनिक मिडियाची स्पर्धा लागली असुन तो सर्व मराठी चॅनेलवर चमकत आहे. त्याच्या वडीलास रोज दोनशेहून अधिक फोन येत आहे.
करजगाव,पानेगाव,निंभारी,वळण,मांजरी,सोनई, लांडेवाडी,राहुरी येथील युवकांनी त्याचा घरी व शाळेत जावून सत्कार केला.
तुळजाभवानी प्रतिष्ठाणचे सदस्य डाॅ. ज्ञानेश्वर दरंदले यांनी जयेशला रोख बक्षीस देवून सत्कार केला. यावेळी पत्रकार विनायक दरंदले, ग्रामसेवक गणेश डोंगरे,एकनाथ माकोणे महाराज,संगित शिक्षक सुनिल पारे उपस्थित होते.
: प्रसिद्ध संगितकार अतुल गोगावले,अमृता खानविलकर, गीतकार गुरु ठाकुर सह विविध राजकीय व्यक्तीनी जयेशचे सोशलमिडीयावर कौतुक केले. गायक चंदन कांबळे यांनी संपर्क करुन जयेशला भेटीचे निमंत्रण दिल्याने आज मंगळवारी तो पुण्याला गेला आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

