shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दशक्रिया विधीला युवाशाहिर रामानंद उगलें यांची शाहिरी कार्यक्रम...!



युवाशाहिर रामानंद - The Trend Setter

महाराष्ट्रातील तमाम जनतेला ज्या शाहिरी झंझावाताने थिरकायला लावले त्या युवाशाहिर रामानंद उगले यांचा शाहिरी कार्यक्रम नुकताच एका आजींच्या दशक्रिया विधीच्या दिवशी झाला.. दशक्रिया विधीच्या वेळी शाहिरी कार्यक्रम करणारा हा बहुदा पहिलाच शाहीर असावा.सदरहू आजी ह्या शाहीर रामानंद उगले ह्यांच्या जबरदस्त चाहत्या होत्या असे त्यांचे सुपुत्र सांगतात. आजींच्या दिवसाची सुरुवात शाहीर रामानंद उगले ह्यांच्या पोवाड्याच्या गर्जनेने व्हायची. पोवाड्याच्या ऊर्जेने आजींचा दिवस अतिशय उत्साहीपणे जायचा. वृद्धापकाळाने आजी निवर्तल्यानंतर त्यांच्या सुपुत्राने आजींच्या दशक्रिया विधीला शाहिरी पोवाडा करुन आईला श्रद्धांजली वाहण्याचा मानस शाहीर उगले यांच्याकडे बोलून दाखवला आणि शाहिरांनी लागलीच होकार दिला.

दशक्रिया विधीला आतापर्यंत कीर्तन, भजन प्रवचन लोकांनी ठेवल्याची उदाहरणे आहेत पण शाहिरी पोवाडा ठेवून एक वेगळंच उदाहरण ह्या कुटुंबाने समाजात रुजवल. सामान्य जनतेला शाहिरीकडे वळवण्याचं काम जसं आदरणीय गुरुवर्य शाहिरसम्राट डॉ. देवानंद माळी ह्यांनी केलं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन तसंच काम त्यांचे शिष्य युवाशाहिर रामानंद जी उगले हे सुद्धा करत आहेत. घरोघरी राष्ट्रीय शाहिरी पोहोचवून ह्या सर्व कलावंतांनी ह्या कलेला लोकाश्रय मिळवून दिला ह्यात दुमत नाही. त्यांच्या पुढील शाहिरी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
आणि मानाचा मुजरा...!!!
जय शिवराय.....
© शाहीर श्रीकांत अनिल शिर्के
धायरी पुणे
9309829422
close