राष्ट्रीय समाज पक्षाच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी तानाजी मारकड तर युवक आघाडीचे अध्यक्ष पदी आकाश पवार यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी:राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुका अध्यक्षपदी तानाजी मारकड तर युवक अध्यक्षपदी आकाश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसे नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष किरण गोपने यांनी दिले आहे
या पत्रामध्ये नमूद केले आहे की राष्ट्रीय समाज पक्षांचे ध्येय -धोरणे सर्व-सामान्य जनतेपर्यत आपली कार्यकरण्याची तीव्र ईच्छा शक्ती पाहाता आम्हाला अभिमान वाटतो म्हणून आपली तालुकाध्यक्ष व युवक आघाडी तालुकाध्यक्ष पदाचा सदर नियुक्तीचा कार्यकाळ पक्षाचे ध्येय व धोरणा व्दारे पक्षातील कार्याच्या विश्लेशनावर अवलंबून असेल आपली निवड ही पक्षाच्या घटनेनुसार एक वर्षासाठी करण्यात आली आहे. आपण ह्या पदावर कार्यरत असताना पक्षाचे सर्व नियम, अटीशी बांधील आहात.
आपल्या निवडीने पक्ष आणि राष्ट्रनायक आ. महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रा.स.प. यांची विचार सरणी सर्व समाजातिल सामान्या पासून उच्च पदस्यांपर्यंत पोहचेल व पक्षाते कार्य जोमाने वाढेल असा विश्वास आपण आपल्या कार्यक्षेत्रातील रा.स.प.च्या सर्व बंधु भगिनीमध्ये पक्षाचा आदर व शिस्त अबाधित ठेवाल ही अपेक्षा आहे.
येणाऱ्या निवडणूका मध्ये आपल्या कार्यक्षेत्रात रा.स.प.ला यशस्वी करून आपण आपली निवड सार्थ ठरवाल असा विश्वास आहे. भावी काळातील आपला कार्यकाळ पक्षाला फलदायी ठरो. यासाठी रा.स.प.च्या आपणास हार्दीक शुभेच्छा अशा आशयाचे पत्र देण्यात आले
यावेळी किरण गोपने, सतीश शिंगाडे ,तानाजी शिंगाडे, सतीश तरंगे ,श्रीनिवास सातपुते, गणेश हेगडकर ,नवनाथ कोळेक,रतात्याराम मारकड , अविनाश मोहिते, सोमनाथ पांढरे मिसे, राजेंद्र देवकाते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

