अनिल मंजूळकर । मेहकर:-
राष्ट्रीयनेते, माजी केंद्रीय मंत्री, तथा महासचिव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी खासदार मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत गाव पातळीवरील जुने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तथा वयोवृद्ध नेते ज्यांनी काँग्रेससाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं असे वयोवृद्ध नेते यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलेला आहे .
यानिमित्त सोनाटी येथील राजाराम वाटसर ,भिकाजी मामा गायकवाड,जनार्दन गायकवाड , बजरंग सोनटक्के , शिवाजीराव देवकर , जगनराव हूले , किसनराव कातडे , मारुती कटारे ,कान्होजी बोरकर या वयोवृद्ध पदाधिकाऱ्यांचा सत्कार काँग्रेसचे जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे आणि मेहकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष देवानंद पवार ,डॉ शेषराव बदर ,दिलीप बोरे , नामदेव राठोड, भूषण काळे ,तुकाराम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी गावातील नामदेवराव अवताडे म, किशोर टेके ,गजानन भानुसे , समाधान तरहाळ , विलास गुंडे , विठ्ठल कातडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर बोरी येथील धोंडू सावकार चनखोरे , शेख गफ्फार शेख अब्बास ,खुषालराव बचाटे , रामभाऊ पातळे या वयोवृद्ध नेत्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी गावातील मा रमेश चनखोरे मा प्रभू पवार मा रमेश बचाटे इत्यादी पदाधिकारी हजर होते त्यानंतर उकळी सुकळी येथील मा शंकरराव बोरे मा अभिमन्यू नवले पाटील मा एकनाथराव अंभोरे मा गयाबाई तृकमाने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावातील मा सुरेश सोनुने मा साहेबराव मंजुळकर मा बळीराम काळे मा विलास तृकमाने मा राजू अंभोरे मा देविदास बोरे मा रामेश्वर सातवडकर मा बंडू जाधव हे हजर होते त्यानंतर मा गजानन काळे परतापुर ज्येष्ठ काँग्रेस नेते यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती यांना शाल श्रीफळ हार व पक्षाचा दुपट्टा घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अत्यंत साध्या पद्धतीने सदरचा कार्यक्रम हा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित केलेला आहे. यानंतर दि 26 व 27 ला तालुक्यातील इतरही गावांमध्ये वयोवृद्ध नेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे असे मा देवानंद पवार आयोजक यांनी कळविले आहे.

