shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्व. मांगीलालजी गट्टाणी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने संतोष जाधव सन्मानित....!

जानेफळ.... (प्रतिनिधी )
स्थानिक जानेफळ येथील श्री सरस्वती शिक्षण समितीचे माजी कोषाध्यक्ष स्व. मांगीलालजी गट्टाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संस्थेचे सचिव श्यामभाऊ गट्टाणी यांचेवतीने मागील अनेक वर्षांपासून संस्थेच्या कर्मचारी वृंदासाठी महत्वाचा असणारा उत्कृष्ट शिक्षक व कर्मचारी पुरस्कार सन.2021-22साठी संस्थेतील कर्तव्यदक्ष कर्मचारी संतोष जाधव यांना देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई मिटकरी तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव श्यामभाऊ गट्टाणी, संस्थेचे सदस्य अशोक धोटे संतोष तोंडे, दिनूअप्पा मिटकरी,प्रवीण रेदासणी, संतोष नाहटा, किरण चांदणे, रमेश निकस, अशोक इंगळे तसेच गट्टाणी परिवारातील गोपाल गट्टाणी, प्रवीण गट्टाणी उपस्थित होते. 

प्रमुख अतिथीयांच्या सत्कारानंतर संस्थेतील शिपाई संतोष जाधव यांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व नगदी रोख देऊन सन्मान करण्यात आला.  पुरस्काराची भूमिका माजी मुख्याध्यापक रमेश निकस व अशोक इंगळे यांनी विशद केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी आर माळी यांनी तर सूत्रसंचालन पुरुषोत्तम शिंदे यांनी केले.तर आभार उपप्राचार्य शिवराम बावस्कर यांनी मानले.
close