अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात ढोल ताशाच्या गजरात गणेशाचे विसर्जन!
बुधवार दिनांक ७/९/२०२२ रोजी भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेतील श्रीगणेशाचे विसर्जन सायंकाळी पाच ते सात (सायंकाळी५ ते ७:००)या वेळेत उत्साह पूर्ण वातावरण संपन्न झाले.विधिवत पद्धतीने संस्थेच्या सर्व संचालकांच्या/ पालकांच्या/सभासदांच्या वतीने श्रीगणेशाची आरती करून विसर्जन मिरवणूक काढून गणेशाच्या विसर्जनाची प्रक्रिया करण्यात आली.
गणेश विसर्जनाची मिरवणूक अतिशय आकर्षक व पाहण्यासारखी होती. जय गणेश साम्राज्य भोसरी,येथील महिला ढोल लेझीम पथकाची विविध प्रकारची प्रात्यक्षिके यावेळेस सादर करण्यात आली. हे ढोल पथक हे या विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. या मिरवणुकीमध्ये परिसरातील नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी, नारायण हट सोसायटीचे सभासद, नारायण हट शिक्षण संस्थेचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले सात दिवस शाळेत गणेश उत्सव काळात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्यात येऊन शाळेतील परिसरात पाण्याच्या हौदा मध्ये गणपतीचे विसर्जन करण्यात आले. हौदातील विसर्जनाची माती वृक्षांना टाकण्यात येणार आहे.
शाळेसाठी गणपतीची मूर्ती मा. श्री. मच्छिंद्रगोरडे साहेब (पी.एस.आय.) यांच्यातर्फे शाळेला भेट देण्यात आली होती.गणेश विसर्जनाचेसंयोजन: नारायण हट शिक्षण संस्थेचे सचिव: प्रा डॉ बाळासाहेब माशेरे अध्यक्ष: संदीप बेंडुरे, अंकुशराव गोरडे,डॉ. वसंतराव गावडे, डॉ. सुयोगकुमार ताराळकर, शिवराम काळे, रोहिदास गैंद, मनोज पवार, डॉ. शरद कदम , संजय सांगळे, मुकुंद आवटे,उज्वला थिटे, शोभा आरुडे, रोहिणी पवार, यशवंत नेहरे, डॉ. सुरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले, मालती माने,प्रतिभा तांबे, मीनल पाटील, सायली संत, सुरेखाताई मुके, भाग्यश्री नगरकर, श्री प्रवीण भाकड यांनी केले.
नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेचे हे पहिले वर्षा असूनअतिशय उत्साह पूर्ण वातावरणात हे सात दिवस संपन्न झाले.शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम नारायण हट शिक्षण संस्थेचे शाळेत राबविण्यात येत असल्यामुळे असल्यामुळे परिसरात या शाळेचा सर्वत्र नावलौकिक वाढत असून कौतुक होत आहे. निगडी येथील ज्ञानप्रबोधनीच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व उपक्रम होत असल्यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

