shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर येथे वृक्षारोपण करून वाढदिवस केला साजरा - अनिषशेठ काळभोर


लोणी काळभोर  - तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर लोणी काळभोर येथील डोंगर परिसरात दि.२६ सप्टेंबर २०२२ रोजी ग्रीन फाऊंडेशन आधारस्तंभ श्री. अनिषशेठ काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण प्रसंगी पळस, वड,पिंपळ, चिंच, कडुलिंब, जांबुळ,लक्ष्मीतरू, खैर,उंबर, कंरज. १०१ देशी झाडे लावुण वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच लोणी काळभोर वनविभाग अधिकारी श्री.बळीराम वायकर साहेब यांच्या सत्कार श्री.अनिष शेठ काळभोर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

          या वेळी वनविभाग वनरक्षक वाईकर साहेब,वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.युवराज काळभोर, ग्रा.सदस्य श्री.भरत काळभोर, ग्रा.सदस्य श्री.नागेश काळभोर, शिवशाही प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री.प्रमोद भाऊ काळभोर, अमित भाऊ काळभोर, अतुल काळभोर, सचिन झेंडे, संतोष काळभोर ,हर्षल काळभोर, अमित जगताप, दत्तात्रय शेडगे,बिरूदेव भास्कर, विनोद यादव, सिद्धार्थ खंडागळे उपस्थित होते. 
     
पूर्वीच्या काळामध्ये झाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण विपुल होते त्यासोबत माणसाला शुद्ध हवा मिळाल्याने माणसाचे जीवन देखील अधिककाळ असायचे. तसेच जंगली च्या जाणले उभारलेली असल्याने पाऊस देखील खुप मोठ्या प्रमाणात पडायचा व प्रदूषणाचे प्रमाण देखील खूप कमी होते.परंतु आजच्या काळामध्ये प्रदूषण आणि ग्लोबर वार्मिंगचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन आणि वृक्ष संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन वाईकर साहेब यांनी केले.
या वेळी शिवशाही प्रतिष्ठान, ग्रीन फाऊंडेशन, वनविभाग लोणी काळभोर, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते.
close