shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्षपदी राजेन्द्र देसाई तर शहराध्यक्षपदी अमोल कदम यांची फेर निवड..!

भोकर [ वार्ताहार ]  - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे श्रीरामपूर चे तालुकाध्यक्षपदी पत्रकार राजेंद्र देसाई यांची तर शहराध्यक्ष पदी प्रेस फोटोग्राफर अमोल कदम यांची फेरनिवड करण्यात येत असल्याचे संघाचे प्रदेश सचीव डॉ. विश्वासराव आरोटे यांनी जाहिर केले.
 शिर्डी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत या फेरनिवडी झाल्याचे जाहिर करण्यात आले.

                        राजेंद्र देसाई


                    अमोल कदम

यावेळी प्रदेश कार्यकारीणी सदस्य निळकंठ कराड,  जिल्हा कार्याध्यक्ष अरुण सोनकर, उत्तरे चे जिल्हाध्यक्ष अनिल रहाणे, दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी पाचपुते, जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत नेटके, विद्याचंद्र सातपुते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे आदि प्रमुख व्यासपिठावर उपस्थीत होते.

यावेळी विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी  पत्रकार बांधवाच्या हिताचे निर्णय घेऊन शासन दरबारी विवीध स्वरूपाचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत डॉ.विश्वासराव आरोटे यांनी मांडले संघटना मजबुत होण्यासाठी  पत्रकार बांधवाना एकत्र करून विवीध ठिकाणी संस्था आस्थापना शासकिय ठिकाणी कमीटी वर नेमणुकी साठी शिफारस करणार असल्याचे मत व्यक्त केले तसेच निवड समिती व डॉ विश्वासराव आरोटे यांचे मार्गदर्शनाखाली व उपस्थिती मध्ये निवड प्रक्रिया फेर निवड करण्यात आली.

श्रीरामपुर तालुका अध्यक्ष पदी राजेन्द्र देसाई तर शहर अध्यक्ष पदी अमोल कदम यांची डॉ आरोटे यांनी फेरनिवड केली प्रसंगी पारनेरचे तालुकाध्यक्ष दत्ताजी घाडगे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे, कर्जतचे तालुकाध्यक्ष मुन्ना पठाण, जामखेडचे तालुकाध्यक्ष दिपक देवमाने, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष तुळशीराम मुखेकर, शेवगावचे तालुकाध्यक्ष रावसाहेब मरकड  राहुरीचे तालुकाध्यक्ष अशोकराव काळे, राहाताचे तालुकाध्यक्ष राजकुमार जाधव, कोपरगावचे तालुकाध्यक्ष मनिष जाधव, नेवासाचे तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड, संगमनेरचे तालुकाध्यक्ष संजय गोपाळे, अकोलेचे तालुकाध्यक्ष अशोक उगले, गणेश आंबिलवादे, गौरव शेटे आदींसह पुणे उत्तर व अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थीत होते.

यावेळी डॉ. विश्वासराव आरोटे,चंद्रकांत झुरंगे  दत्ता पाचपुते, निळकंठ कराड आदींची मार्गदशनपर भाषणं झाली. त्यात सर्वांना विश्वासात घेवून श्रीरामपूर शहर व तालुका कार्यकारीणी लवकर च जाहिर करण्यात येणार असल्याचे जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे यांनी सांगीतले.
प्रास्ताविक दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी पाचपुते, सुत्रसंचालन जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे तर आभार राहाताचे तालुकाध्यक्ष राजकुमार जाधव  यांनी आभार मानले.
close