( गावकऱ्यांच्या कृतीशीलतेचे यश )
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतला आर .आर .आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेचा जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार पन्नास लाख रुपये जाहीर झाला.
मंगळवार रोजी केज पंचायत समिती येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार डॉ. प्रीतमताई गोपीनाथ मुंडे, केज तालुक्याच्या आमदार नमिताताई मुंदडा, भाजपचेज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर , जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांच्या हस्ते सरपंच आश्विनीताई संतोष देशमुख ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वीकारला.पंचायत समिती केज येथे हा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने पार पडला. गावाने एकत्रितपणे काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी व्यक्त करून गावाचे अभिनंदन केले.
गाव सुजलाम सुफलाम व्हावं म्हणून सतत गावकऱ्यांनी मेहनत घेतली आणि यामधून या स्पर्धेसाठी चे निकष पूर्ण करण्यासाठी सर्व कामे केली. तपासणी मधून चांगले गुण मिळाल्यानंतर त्या गावाला हा पुरस्कार जाहीर झाला. जलसंधारण, वृक्षलागवड,सौचालय, सार्वजनिक सौचालय,सांडपाणी व्यवस्थापन,शोष खड्डे,पाणी गुणवत्ता तपासणी, नळजोडणी,एल.ई.डी.पथदिवे, सौर पथदिवे,सार्वजनिक इमारतीचे सुशोभीकरण,घनवन प्रकल्प,लसीकरण सत्र नियमितता,ग्रामपंचायतिचे 1 ते 33 नमुने ऑनलाईन करणे, ग्रामपंचायत मार्फत वीज बिल भरणा करणे,वृक्ष लागवड रजिस्टर अद्ययावत करणे,बाजार तळ घनकचरा व्यवस्थापन, आंतरजातीय विवाह,सुकन्या समृद्धी योजना,माझी कन्या भाग्यश्री योजना,अटल पेन्शन योजना,जनधन खाते, दिव्यांग व्यक्तींची नोंद करणे,आधार कार्ड काढणे/दुरुस्ती करणे कॅम्प .
संबंधित विभागाचे सहकार्य
जि.प.बीड मुख्याधिकारी साहेब,उपमुख्याधीकारी,
पंचायत समिती केज गटविकास अधिकारी,
ग्रामपंचायत सर्व सदस्य
सर्व कार्यालईन कर्मचारी ग्रामसेवक,सरपंच पोलीस स्टेशन,पत्रकार,पोस्ट ऑफिस, भारतीय स्टेट बँक,घरकुल विभाग,एकात्मिक बाल विकास सेवा योजना,जि.प.शाळा मुख्याध्यापक शिक्षक,शिक्षिका अंगणवाडी,आपले सरकार केंद्र, ताई,मदतनीस,ग्रामसंघ,बचत गट,महावितरण,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,ग्रामपंचायत शिपाई, संगणक परिचालक ग्रामरोजगार सेवक,पाणी पुरवठा कर्मचारी
,आरोग्य विभाग,तहसील, (केज) व जिल्हा परिषद बीड)
आदींनी सहकार्य दर्शवले
------------------------
यापुढेही गावाच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर असून हा पुरस्कार गावकऱ्यांना समर्पित करत असल्याच्या भावना सरपंच अश्विनी संतोष देशमुख यांनी व्यक्त केल्या.
या यशाबद्दल मस्साजोग वगैरे ग्रामपंचायतचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. मस्साजोगचा आदर्श इतर गावांनी घ्यायला हवा.
पुरस्कार वितरण कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


