shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संघटनेचे कार्य मधमाशीच्या पोळ्या प्रमाणे असावे - दत्ता कडू पाटील....!

प्रहार सदैव कामगारांच्या पाठीशी आप्पासाहेब ढूस 
देवळाली प्रवरा येथे प्रहारचे उत्कृष्ट कार्य - पत्रकार शिवाजी घाडगे..!

देवळाली प्रवरा - २१ सप्टेंबर

महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाच्या वतीने कामगारांना देण्यात येणाऱ्या बांधकाम  साहित्याचे देवळाली प्रवरा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार सेलच्या वतीने माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील यांचे अध्यक्षतेखाली व आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस आणि राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे यांचे प्रमुख उपस्थितीत जवळपास दहा हजार रुपये किमतीचे बांधकाम साहित्य (पेटी) वीस कामगारांना म्हणजे जवळपास दोन लक्ष रुपये किमतीचे बांधकाम साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना  दत्ता कडू पाटील म्हणाले की,  संघटनेचे कार्य हे मधमाशीच्या पोळ्या प्रमाणे असावे.. प्रसंगी बोलताना प्रहार सदैव कामगारांच्या पाठीशी असल्याचे आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले. आणि पत्रकार शिवाजी घाडगे यांनी प्रहारच्या कार्याचे कौतुक केले. 

     प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, केंद्र शासनाचा जलनायक पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे,  प्रहार देवळाली प्रवरा शहराध्यक्ष विजय कुमावत,  उपाध्यक्ष शिवाजी मुसमाडे, प्रहार राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष एकनाथ वाणी, गणेश बालके, देवळाली प्रवरा प्रहार महिला शहर अध्यक्ष भाग्यश्री कदम, राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्ष रजनीताई कांबळे, श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे प्रहार कामगार सेल प्रमुख बाळासाहेब कराळे, देवळाली प्रवरा प्रहार कामगार सेलचे प्रमुख किरण पंडित, एकल महिला पुनर्वसन समितीचे प्रशांत कराळे, प्रहार दिव्यांग सेलचे राहुरी तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे,  प्रहार दिव्यांग शहर प्रमुख सलीम शेख आदींसह असंख्य कामगार व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
       प्रसंगी बोलताना दत्ता कडू पाटील पुढे म्हणाले की देवळाली प्रवरा येथील प्रहारचे कार्य अत्यंत उत्तम रित्या सुरू असून संघटन हे मधमाशीप्रमाणे असावे प्रपंच जसा नेटका असेल तर समाजकारण करावे व त्यानंतर राजकारण त्याप्रमाणे न थांबता सर्वांनी समाजकारण व राजकारणात पुढे यावे गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली की तो पेटून उठतो त्याप्रमाणे समाजातील तळागाळामध्ये जाऊन प्रहार सध्या कार्य करत आहे कर्म करा कर्माचे फळ नक्की मिळतेच प्रहारला योग्य न्याय मिळणार असून प्रहार शिवाय येथे पर्याय शिल्लक राहणार नाही असे त्यांचे कार्य पाहता वाटते. प्रसंगी बोलताना पत्रकार शिवाजी घाडगे यांनी देवळाली प्रवरा शहरामध्ये सुरू असलेल्या कार्याचा गौरव करून प्रहारच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.!

      प्रहार कामगार सेलच्या वतीने  केंद्र शासनाचा जल नायक पुरस्कार मिळाल्याबद्दल या कार्यक्रमामध्ये पत्रकार शिवाजी घाडगे यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रसंगी वीस बांधकाम कामगारांना बांधकाम साहित्याचे वितरण करण्यात आले.प्रहार जनशक्ती पक्ष कामगार सेलचे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख बाळासाहेब कराळे यांनी प्रास्ताविक केले व आप्पासाहेब यांनी सर्वांचे आभार मानले.
close