कर्मयोगी शंकररावजी पाटील पुण्यतिथी निमित्त शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन
इंदापूर प्रतिनिधी:कर्मयोगी ऋषी तुल्य शंकरराव पाटील उर्फ भाऊ यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत भाऊंच्या समाधी स्थळी अंगारकी चतुर्थी असल्याने साबुदाणा खिचडी व केळी या अल्पोपहाराचे २००० ते ३००० नागरिकांना वाटप करण्यात आले. यासाठी २५ किलो साबुदाणा खिचडी व पाच हजार केळीचे वाटप करण्यात आले. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री तुषार रंजनकर, विश्वस्त श्री अरविंद गारटकर यांच्या मार्ग्दशानातून अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. या साठी शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र चे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर, सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई आतार, श्री भारत बोराटे सर, श्री संजय शेलार सर, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे एडमिन इंचार्ज श्री दिपक जगताप, जावीद हबीब अकॅडेमीचे प्रमुख अमोल राऊत, संस्थेचे कर्मचारी श्री बाबासाहेब भोग, रोहित साळुंके, आरती घोडके, अमृता भोंग तसेच संस्थेच्या सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनीनी विशेष परिश्रम घेतले.

