shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभ्यासाबरोबरच पुस्तकाला आपला मित्र बनवा व वाचनाची आवड निर्माण करा - मनोज राऊत


प्रतिनिधी : सुर्यकांत होनप

करमाळा : १ /  जिनियस प्रोऍक्टिव्ह  अबॅकस सेंटर,जेऊर येथील २५ विद्यार्थ्यांनी समर नॅशनल स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा  करमाळा येथील यशकल्याणी सेवा भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.  

प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत सर यावेळी बोलत होते ते म्हणाले की मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी गणित विषया बरोबर मुलांना पुस्तक वाचनाची आवड असणे गरजेचे आहे. पुस्तकांना आपले मित्र बनवून त्यातून नवीन नवीन गोष्टी मुलांनी आत्मसात केल्या पाहिजेत व स्वतःचे वेगळे असे व्यक्तिमत्व बनवले पाहिजे . मुलांना सृजनशील बनवणे काळाची गरज आहे असे मनोज राऊत सरांनी मनोगत व्यक्त केले. 

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक प्रा. मा. श्री .गणेश करे - पाटील हे होते. यावेळी   श्रिराज झांजुर्णे , दर्श रणदिवे,आरोही पाटील , अनन्या पाटील, ईशान फकीर,अनुज निर्मळ,आदित्य पाटील  या विद्यार्थ्यांनी अबॅकसचे प्रात्यक्षिक सादर केले तर सई नलवडे,स्वरा निर्मळ, पलक बलडोटा, आराध्या वेदपाठक, राजवीर बाबर,वेदांती निमगिरे,ईश्वरी काशीद, शरण्या साळुंके, पाथ्रुडकर शाश्वत  या छोट्याश्या मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच पालकांमधून सौ.स्वाती बाबर  व श्री .वैभव पाथ्रुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

यावेळी व्यापीठावर श्री . चंद्रशेखर शिलवंत ,श्री अशपाक जमादार, सौ .सुनीता देवी (संचालिका , नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूल, करमाळा), सौ .सोनाली शिंदे (संचालिका, लिटिल स्टार अबॅकस अकॅडमी , बार्शी), मा.सभापती सौ.सुनीता निमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते . 
यावेळी सर्व मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी , सन्मानपत्र त्याचप्रमाणे यशकल्याणी संस्थेकडून सन्मानपत्र ,मेडल देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. करे पाटील सरांनी अबॅकस साठी लागणारी सर्वतोपरी मदत यशकल्याणी संस्था देण्यास कटिबध्द असल्याचे सांगितले.जिनियस प्रोअॅक्टिव अबॅकस सेंटर च्या संचालिका कु.अंकिता वेदपाठक यांच्या कार्याबद्दल  विशेष आभार मानत कौतुक केले .यावेळी कार्यक्रमासाठी  पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. किसन कांबळे सर
अध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना करमाळा तालुका आणि संजयकुमार राजे घोरपडे सर तालुका अध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना माध्यमिक विभाग यांनीही अभिनंदन केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अंकिता वेदपाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री . विष्णु वेदपाठक यांनी मानले.हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी यशकल्याणी संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
close