कर्मयोगी शंकरराव पाटील यांना पतंजली योगा परिवार व युवा भारत यांच्याकडून अभिवादन
स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या
पुण्यतिथीच्या निमित्ताने आचार्य बालकृष्णजी वृक्षमित्र पुरस्कारचे वितरण...
इंदापूर प्रतिनिधी: स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या सोळाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज पतंजली योगा परिवार व युवा भारत यांच्या वतीने शाळा नंबर एक व दोन येथे सुरू असलेल्या स्थायी योगवर्गामध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अॅड अशोकराव कोठारी तर प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष अशोकबापू इजगुडे ,सामाजीक कार्यकर्ते हमीदभाई आतार उपस्थित होते.
भाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त निमित्ताने इंदापूर शहरांमध्ये इंदापूर ऑक्सिजन पार्क म्हणजेच बायोडायव्हर्सिटी, जडीबुटी उद्यान याची निर्मिती करणारे इंदापूर नगरपालिकेचे कर्मचारी यांना आचार्य बालकृष्णजी वृक्ष मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बायोडायव्हर्सिटी हे इंदापूर शहराचे ऑक्सिजन पार्क असून त्या ठिकाणी दुर्मिळातील दुर्मिळ वनस्पतींची लागवड आणि जतन करण्याचे काम अशोक चिंचकर आणि त्यांच्या सर्व टीमने केल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार या ठिकाणी करण्यात आला.

