ए. आर. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष रामभैय्या गायकवाड, यांच्या वाढदिवसानिमित्त मुकबधीर शाळेवरती तेजपृथ्वी ग्रुप, व ए. आर. फाउंडेशन यांच्यावतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: मूकबधिर निवासी शाळा इंदापूर जिल्हा पुणे शाळेमध्ये ए. आर. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष रामभैय्या गायकवाड, यांच्या वाढदिवसानिमित्त मुकबधीर शाळेवरती तेजपृथ्वी ग्रुप, व ए. आर. फाउंडेशन यांच्यावतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करण्यात आला, त्याप्रसंगी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा, तसेच इंदापूर पोलीस स्टेशन महिला दक्षता समितीत काम करणाऱ्या सौ.अनिताताई नानासाहेब खरात, व तेजपृथ्वी ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, गणेशभाऊ शिंगाडे, तसेच उद्योजक लक्ष्मण वाघमोडे-पाटील, सरडेवाडी ग्रामपंचायत सदस्य,गोकुळ कोकरे-पाटील,व ए.आर फाउंडेशनचे बापूराजे गलांडे, इतर मान्यवर उपस्थित होते .
यावेळी अनिता खरात म्हणाल्या, की तेजपृथ्वी ग्रुप नेहमी गोरगरीब, कष्टकरी, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुर, यांच्या भल्यासाठी काम करतो, आणि येथून पुढेही आमचे मार्गदर्शक महेंद्र रेडके, व सभापती पांडूरंगत मारकड, यांच्या मार्गदर्शनाखाली तेजपृथ्वी ग्रुप व य आर फाऊंडेशन एकामेकांच्या सहकार्याने, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवू व येथून पुढेही या संस्थेस कोणत्याही मुलांना किंवा गुरुजणांना काहीही अडचण आली. तर आपण कधीही आपल्या ताईला हक्काने सांगा, तुमच्या सर्व अडीअडचणी सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन, तसेच
आज रामभैय्या गायकवाड यांना आपल्या बाळगोपाळांचे आशिर्वाद लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, यावेळी शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ, व विद्यार्थी, खुप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

