shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विना पोलिस बंदोबस्त श्री गणेश विसर्जन करून,बेलापूरकरांनी सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण केला - पोलिस अधीक्षक मनोज पाटील

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
शौकतभाई शेख श्रीरामपूर:

बेलापूर:- सण व उत्सव समाजात सलोखा व आनंद  निर्माण करण्यासाठी आसतात.श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरगावाने विना पोलिस बंदोबस्त श्री गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न करुन सामाजिक सलोख्याचा आदर्श,'बेलापूर पॕटर्न'निर्माण केला,यापासून प्रेरणा घेवून हा पॕटर्न राज्यभर राबविला तर सण उत्सवांचा आनंद व्दिगुणित होवून सण उत्सवाःचा उद्देश सफल  होईल असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, बेलापुर ग्रामपंचायतीचा शतक महोत्सव याचे औचित्य साधुन बेलापुरकरांनी गणेशोत्सव काळात गावात शांतता राखुन विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्ज पार पाडले गणोशोत्सव काळात जिवंत देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण तसेच गणेश मंडळांना सन्मानपत्र असा कार्यक्रम बेलापुर येथील बालाजी मंदीर येथे आयोजित करण्यात आला होता .त्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य शरद नवले हे होते .तर बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे,  रणजित श्रीगोड, कनजी टाक, एकनाथ उर्फ लहानु नागले, हाजी ईस्माईल शेख ,गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,रामेश्वर सोमाणी, प्रफुल्ल डावरे, मोहसीन सय्यद, शफीक बागवान,सुधाकर खंडागळे आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

पोलीस अधिक्षक मनोज पाटील पुढे म्हणाले की माझ्या २५ वर्षाच्या नोकरीत पोलीस बंदोबस्त नको असे म्हणणारे हे पहीले गाव पाहीले आहे,आनंद लुटतानाही मनात काहीतरी भिती असते,त्यामुळे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जाते, बेलापुरगावाने विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याचा दिलेला शब्द खरा करुन दाखविला बेलापुरकरांनी राबविलेला हा "बेलापुर पँटर्न" जिल्ह्यात नव्हे तर राज्यात लागु व्हावा .सण उत्सव ज्या उद्देशाने सुरु झाले तो उद्देश बाजुलाच राहीला. त्याचे कारण आपण विसरत चाललो आहोत त्यामुळे पोलीसावरील कामाचा ताण वाढत आहे .सर्वच जण पोलीस बंदोबस्त मागतात,सण उत्सव साजरा करणारे रात्री अकरा - बारा नंतर झोपी जातात पण पोलीस मात्र पहारा देत असतो, सण उत्सवात काही विघ्न येवु नये म्हणून दारुबंदी करावी लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या गावाचे अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो असुन इतरांनी देखील या गावाचा आदर्श घ्यावा असे अवाहनही पाटील यांनी केले अध्यक्षीय भाषणात शरद नवले म्हणाले की,गावचे सरपंच, उपसरपंच,भाजपचे ज्येष्ठ नेते सुनिल मुथा,पञकार संघाचे भास्कर खंडागळे ,देवीदास देसाई तंटामुक्तीचे पुरुषोत्तमा भराटे, प्रफुल्ल डावरे,मोहसिन सय्यद , नितिन शर्मा, हाजी ईस्माईल शेख,सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुस्लीम बांधव ,विविध सामाजिक व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार बंधु,सर्वपक्षिय नेते, ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असुन गावाच्या विकासासाठी उज्वल भविष्यासाठी अशीच भूमिका ठेवावी असे अवाहनही नवले यांनी केले.      
       
या वेळी अहमदनगर गुन्हा अन्वेषण विभागाचे अनिल कटके,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड ,तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे ,हाजी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद भाजपाचे प्रफुल्ल डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले .या वेळी देखावा स्पर्धेत प्रथम क्रमांक हिंदु संघटक विर सावरकर मित्र मंडळ रुपये पाच हजार,द्वितीय क्रमांक छत्रपती तरुण मंडळ रुपये तिन हजार, तृतीय क्रमांक गौरी गणेश बाल मित्र मंडळ रुपये दोन हजार, सिध्दी विनायक युवा मंच रुपये एक हजार, रामराज्य मित्र मंडळ रुपये एक हजार तसेच सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला तसेच गणेश विसर्जन शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व गणेश मंडळ, पोलीस पाटील,जामा मस्जिद ट्रस्ट,महावितरणचे अधिकारी कर्मचारी,गणेश विसर्जन काळात मदत करणारे सफाई कर्मचारी, पोहणारे,बेलापुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आदिंचा सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला. तसेच विना पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडल्यास रु.११,००० बक्षीस देईल असे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत जाहीर केले होते तसेच श्री. गवळी साहेबांनी ११००० रुपये दिल्यानंतर मी ही ११००० रुपये बक्षीस देईल असे तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनी जाहीर केले होते. काल जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या समक्ष पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी रु.११००० बक्षीस रक्कम सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्याकडे सुपूर्द केली. त्या नंतर लगेच एकनाथ नागले यांनी देखील रु.११००० सरपंच, उपसरपंच यांच्या कडे जमा केली.

या वेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले.
close