shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त सर्व पिकांचे त्वरित पंचनामे करावेत; डॉ.मुरकुटे



शौकतभाई शेख । श्रीरामपूर :
अतिवृष्टीने पिकांमध्ये पाणी साचले असून तालुक्यातील नुकसानग्रस्त सर्व प्रकारच्या पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी पंचायत समितीच्या  सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केली आहे. भोकर, मुठेवाडगाव, टाकळीभान, खोकर परिसरातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी त्यांनी केली व त्वरित नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

बळीराजावर यावर्षी चांगली पिके असताना जास्तीच्या पावसाने पिकांचे नुकसान होऊन पिकांमध्ये पाणी साचले आहे.  हे अस्मानी संकट कोसळल्याने बळीराजा हतबल झाला आहे. काही दिवसांवरच दिवाळीचा सण येऊन ठेपला असून या अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. तरी नुकसानग्रस्त पिकांची पंचनामे करून बळीराजाला न्याय द्यावा अशी मागणी मा.सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केली आहे.
 याप्रसंगी कामगार तलाठी अशोक  चितळकर भाऊसाहेब, सहाय्यक कृषी अधिकारी रुपाली काळे,ज्येष्ठ नेते बाबा पोखरकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, भाऊसाहेब पटारे, सुदाम पटारे, वाल्मीक जाधव,दिलीप पटारे, भाऊसाहेब भोईटे,शिवाजी पवार,लहानु विधाटे, गणेश विधाटे,निखिल कांबळे, गणेश गवारे ,विशाल जाधव, प्रसाद जाधव, योगेश शिंदे, योगेश भोईटे, किरण पटारे, आदी उपस्थित होते.

आमदार लहु कानडे यांचीही मागणी
राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा अशी आमदार लहु कानडे यांनीही मागणी केली आहे.दरम्यान आमदार लहु कानडे यांनी पावसाने होणारे शेतीची नुकसान, बुजल्या जाणाऱ्या विहीरींचे व शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची विधीमंडळामध्ये मागणी केली आहे, तसे शासनाने परीपत्रक काढले आहे, त्यानुसार राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसानीचे समक्ष पाहणी करून अधिकारी स्तरावर पंचनामे करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांचेकडे केलेली आहे.
close