shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उल्कापाती सरोवराची वाट बिकट...! रस्ते केले खड्ड्यात..!

लोणार । विजय गोलेछा:-                         
देश विदेशातील पर्यटकांना व संशोधकांना खेचून आणण्याची क्षमता असणारे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे व देशातील एकमेव  उल्कापाती सरोवराकडे जाणारां रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेल्याने सरोवराकडे जाणारी वाट बिकट झाल्याने पर्यटकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

                लोणार येथील जगप्रसिद्ध उल्कापाती सरोवर 
                
उल्कापाताने निर्मित एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या वैज्ञानिकांना  संशोधनासाठी पर्वणी ठरणाऱ्या सरोवराला वेगवेगळ्या अख्ख्यायिका  आहे  नैसर्गिक चमत्काराने निर्मित झालेल्या सरोवराला ऐतिहासिक वारसा लाभलेला असताना पौराणिक महत्त्व आहे यामुळे या सरोवराची नोंद स्कंदपुराण व पद्मपुराण मध्ये यांचा उल्लेख आढळतो.  जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या उल्कापाती सरोवराच्या काठावर पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरणाऱ्या पौराणिक ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या गंगा भोगावती विरजधारा तीर्थावर देशी-विदेशी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते याच रस्त्यावरून धार ते जुने विश्रामगृह पर्यंत रस्त्यावरून पर्यटकांना फिरावे लागते  याच मार्गाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तसेच  राज्यपाल भगतसिंग कोशारी व हायकोर्टचे न्यायाधीश यांनी सरोवराला व विरजधारा तीर्थाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती.

यावेळेस संबंधित विभागाकडून व नगरपालिकेकडून या रस्त्यावर थातूरमातूर मुरूम टाकून रस्ता तयार करण्यात आला होता याबाबत हजारो रुपयाची बिले काढल्यानंतर सतत पावसामुळे या रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने रस्त्यावर तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. एकीकडे पर्यटनाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनामार्फत पर्यटन विभाग, पुरातत्त्व विभाग, वन विभागामार्फत विविध विकास कामांसाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या घोषणा केल्या जातात परंतु या विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याने पर्यटकांना त्रासाचे बनले आहे.
close