shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शतकपूर्ती ओलांडलेल्या कन्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप..

लोणार (विजय गोलेछा)  :-
अमृत महोत्सव वर्षानिमित्त सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २०२२ अंतर्गत  पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लोणार येथे जैन अलर्ट ग्रुप व हनुमान उत्सव समिती व गिरीश भुरावत यांच्यातर्फे एकशे दहा वर्षापूर्वी स्थापन झालेल्या नगर परिषद कन्या शाळा मुलींच्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या मध्ये वाटर कलर स्केल पट्टी ,खोड रबर, शॉपनर, पेन्सिल इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.

साहित्याचे वाटप करताना शाळेचे मुख्याध्यापक सतीश कापुरे ,वर्ग शिक्षक नितीन राऊत, टीचर .सौ ज्योतीताई सुरडकर, सौ. कल्पनाताई आढाव, सौ. सुनिता ताई मापारी, मीनाताई नागरे, व शहरातील जैन अलर्ट ग्रुप आणि हनुमान उत्सव समितीचे सदस्य भाजपाचे जिल्हा सचिव निर्मल संचेती, मा. शहराध्यक्ष अविनाश शुक्ला, श्रेयांस संचेती ,बंटी पुरोहित, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुंदर संचेती, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम बनमेरू ,बल्लू मोरे, देवांग संचेती. अर्जुन रामावत, अक्षय संचेती, रवी नागरे, रंजीत परमार, सुरज गेलोत, निखिल मुलगे, रामराज्य प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.
close