shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोणार सरोवर येथील गंगा भोगावती विरज धार आंघोळीसाठी खुली करा- सचिन कापुरे


लोणार । विजय गोलेछा :-

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुका येथील भौगोलिक, ऐतिहासिक व पौराणिक, धार्मिक ‌महत्व असलेल्या उल्कापाती सरोवराच्या काठावर असणाऱ्या गोमुखातून हजारो वर्षापासून अखंड वाहणार्‍या धारेला गंगेचे महत्व आहे. 



या धार्मिक स्थळाला उच्च स्वरूपाचे अनन्यसाधारण महत्त्व असून हे जगातील एकमेव पवित्र मानलेले ‌ठिकाण आहे.‌या स्थळाला जगभरातील भाविक व पर्यटक मोठया प्रमाणात भेट देतात. या पवित्र ठिकाणी भाविक स्नान करून  स्वतः ला धन्य मानण्याची प्रथा सर्वश्रुत आहे.. ही हजारो वर्षांपासूनची परंपरा अविरतपणे चालू होती. परंतु सतत दोन वर्षापासून पुरातत्त्व विभागाने या धारेवर आंघोळीसाठी (स्नानासाठी) कायम स्वरूपी बंदी ठेवल्यामुळे भाविकांची घोर निराशा होत आहे. येथील पवित्र ठिकाणी भाविक आल्यानंतर त्यांना स्नान करण्यासाठी बंदी ‌आहे असे कळल्यावर भाविक दु:खी व निराश होऊन खंत व्यक्त करताना दिसतात. या ठिकाणी स्नानासाठी आलेल्यांना काही नियमावली जाहीर करून गंगा भौगावती विरज धार‌ आंघोळीसाठी सुरू करण्याचे निवेदन सचिन कापुरे  व लोणारकर टीम ने उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) मेहकर यांना दिले आहे.

लोणार सरोवराच्या काठावर असणाऱ्या पर्यटकांना विशेष आकर्षण ठरणाऱ्या विरजधार तीर्थ मधील गोमुखातून गंगेचे पाणी येत असून प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही धार धन्य झाल्याची आख्यायिका सर्वश्रुत आहे. याच परिसरात झोपलेल्या स्थितीतील महाबली हनूमानाचे मंदिरही आहे. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांसोबत भाविक भक्तांमध्ये आंघोळ करून स्वतःला धन्य मानण्याची प्रथा आहे. ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व असलेल्या या वास्तूचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभाग नागपूर यांच्याकडे आहे. सर्व पौराणिक वास्तूचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्वतःचे कार्यालय सुद्धा उपलब्ध आहे. परंतु पुरातत्व विभागाने सतत दोन वर्षापासून कोरोनाच्या नियमामुळे आंघोळ करण्यासाठी बंदी घातलेली आहे.

केंद्र व राज्य शासनाने सर्व धार्मिक स्थळं दर्शनासाठी खुली केली असून समुद्रीब्रिज व वॉटर पार्क पूर्णतः  सुरू केले असतानाही पुरातत्व विभागाने अद्यापही या धारेवर आंघोळ करण्यासाठी भाविकांना मज्जाव करून बंदी घातलेली आहे. यामुळे लोणार येथील बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.येथील बाजारपेठ पुन्हा फुलण्यासाठी ल़ोणारकर व भाविकांची अधूरी इच्छा पुर्ण ‌व्हावी.यासाठी विरजधार तीर्थ अंघोळीसाठी त्वरित खुली करण्याची मागणी कोविड 19 चे एक्सीडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्याकडे मी लोणारकर टीमचे सदस्य तथा महाराष्ट्र पक्षीमित्र जिल्हा कार्यवाहक सचिन कापुरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. 
close