प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १८/ दरवर्षी प्रमाणे १४ सप्टेबर हा दिवस करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये विवीध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यामध्ये हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, हिंदी भाषेचे महत्त्व सांगणारी मनोगते आदी उपक्रम राबवण्यात आले. प्रार्थनेच्या वेळी प्रास्ताविक सहशिक्षक असिफ मुलाणी सर यांनी केले त्यानंतर विद्यार्थीनी कु. बोराडे व कु. संस्कृती कांबळे तसेच हिंदी विषय शिक्षक व क्रिडाशिक्षक सचिन दळवे सर यांनी हिंदी भाषा दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतामधून सांगितले. या कार्यक्रमाचे आभार हिंदी विभाग प्रमूख अमित बोधे सर यांनी मानले .
या प्रसंगी मुख्याध्यापक पोपटराव कापले सर, उप मुख्याध्यापक अनिस बागवान सर, पर्यवेक्षक सतिश शिंदे सर व सर्व शिक्षक शिक्षीका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

