मेहकर (अनिल मंजुळकर ) :- अलीकडच्या काळात संपूर्ण राज्यभर बोगस तणनाशक व कीटकनाशक प्रकरण राज्यात गाजत असतानाच मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथील शेतकरी राजेंद्र अंबर उतपुरे यांनी दिनांक 6 सप्टेंबर रोजी कृषी विस्ताराधिकारी पंचायत समिती मेहकर यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याने कृषीधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
तक्रारीत असे म्हटले आहे की शिवकृपा कृषी केंद्र जानेफळ यांच्याकडून दिनांक 26 /6 /2022 ते 19 /8 /2022 पर्यंत आतापर्यंत आठ वेळा तणनाशक व कीटकनाशक किंमत 22 हजार रुपये चे औषधी आणून माझ्या शेतातील 25 एकर शेतात त्यावरील पिकावर तणनाशक व कीटकनाशकाची फवारणी केली. त्याचा योग्य पद्धतीने वापर केला परंतु त्याचा कुठलाही प्रकारचा फायदा झाला नाही, सदर दुकानातील औषधी पूर्णपणे बोगस निघाल्यामुळे माझ्या शेताचे पिकाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहेे
सदर शिवकृपा कृषी केंद्र जानेफळ यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सांगितले तुझ्याकडून काय होईल ते करून घे? परत माझ्याकडे येशील तर याद राख? अशा पद्धतीची धमकी देऊन मला दुकानातून परत पाठवले. त्या अनुषंगाने मी परीहार,कृषी विस्ताराधिकारी पंचायत समिती मेहकर यांच्याकडे तक्रार दाखल केली असून माझ्या शेताची झालेली नुकसान भरपाई मला मिळावी अन्यथा मला आंदोलनाचा पवित्र घ्यावे लागेल अशा पद्धतीचा तक्रार अर्ज सहा सप्टेंबर रोजी राजेंद्र उतपुरे यांनी मेहकर पंचायत समितीचे दाखल केला आहे. त्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी पंचायत समिती विस्तार अधिकारी परीहार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कळवले संबंधित प्रकरणाची आम्ही तक्रार निवारण समितीच्या मार्फत चौकशी करणार आहोत त्यानंतर वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल.
कृषी विभाग साखर झोपेत !
संपूर्ण जिल्ह्यात सह शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत्या प्रमाण आणि शेतामधीलच बोगस औषधी प्रकरण गाजत आहे. शेतकऱ्यांच्या बरेच तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत. परंतु कृषी दुकानदाराशी हात मिळवणी करून शेतकऱ्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्याचा प्रताप मेहकर कृषी अधिकारी करत असल्याचे शेतकरी मधून बोलल्या जात आहे. कृषी विभाग कुठेच ठोस पाऊल उचलताना दिसत नसल्याने शेतकऱ्याने दाद कोणाकडे मागायची.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

