shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी एक्सप्रेस चे संपादक रमेश जेठे (सर) यांची ओड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया,नवी दिल्ली( OCCI )या राष्ट्रीय संघटनेत "राष्ट्रीय सल्लागार " पदी निवड

तीस वर्षांची  तपश्चर्या आली फळाला ...

 सामाजिक कार्यकर्त्यांनी केला सत्कार..!

प्रतिनिधी : आसावरी वायकर
 
अहमदनगर : १० / महाराष्ट्रात दबंग ‌पत्रकार म्हणून नावलौकिक असलेले स्वाभिमानी संपादक सेवा
 संघाचे संघटक तथा शिर्डी एक्सप्रेस चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते मा.रमेश जेठे (सर) यांच्या तीस वर्षांच्या काळात केलेल्या सामाजिक कामाची दखल ओड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया,नवी दिल्ली ( OCCI) या राष्ट्रीय संघटनेने घेऊन त्यांची "राष्ट्रीय सल्लागार " पदी निवड केली आहे.

 त्यानिमित्ताने नगर तालुक्यातील शिंगवे गावचे सरपंच व निलेश लंके प्रतिष्ठान, चे सदस्य श्री.बाबासाहेब काळे पाटील, वडार समाज संघाचे नगर तालुक्याचे अध्यक्ष मा.मुरलीधर शेलार, आदिवासी महादेव कोळी समाजाचे प्रतिनिधि व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगर तालुका सरचिटणीस राजेंद्र विठ्ठल मांढुळे पा.यांनी मा.रमेश‌ जेठे सर यांच्या शिर्डी एक्सप्रेस कार्यालयात फेटा बांधून शाल, श्रीफळ देऊन आदरपूर्वक सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या..! 

तसेच "शिर्डी एक्सप्रेस"परिवाराचे वतीने सरपंच ‌बाबासाहेब काळे पाटील, मुरलीधर शेलार व  राजेंद्र मांढुळे पा.यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वडार समाज संघ प.महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र मंजूळे, हभप सखाराम महाराज जेठे, लक्ष्मण लष्कर, सागर धनवटे, शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह चे कार्यकारी संपादक विशाल जेठे आदी उपस्थित होते.

रमेश जेठे यांचे सामाजिक कार्य..

रमेश जेठे (सर) यांनी   महाराष्ट्र राज्यातील अनेक असंघटित बांधकाम कामगारांची कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करून अनेकांना  शासकीय योजना मिळवून देऊन दिलासा दिला आहे. गरिबांना व दारिद्रय रेषेखालील लाभार्थीना घरकुले मिळणेसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा, कोरोना काळात राज्यात अडकलेल्या अनेकांना घरी जाण्यासाठी सर्वोतोपरी हस्थे परहस्थे मदत, गरजूंना धान्य किटाचे वाटप, रेशनकार्ड नसलेल्या गरीब कुटुंबांना पिवळे रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा.. , न शिकलेल्या व‌ कमी पुरावे असलेल्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी अधिकारी यांना भेटून केलेली मदत,कोरोना काळात पिडीतांना दवाखान्यात नेण्यासाठी अनेकांना सहकार्य, दवाखान्यात मोठ्या प्रमाणात बील आकारणी होत असल्यामुळे अशा लोकांना बील कमी करण्यासाठी धावून जाऊन दवाखान्याचे बील कमी करण्यासाठी प्रयत्न .. अनेक वंचित लाभार्थीना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न.. अशा अनेकविध कामातून त्यांनी समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे..!

त्यांचे काम निस्वार्थ भावनेचे असल्यामुळे ते समाजांत लोकप्रिय आहेत, म्हणूनच त्यांचे वर फेसबुक, ट्विटरवर,, इन्स्टाग्राम,वाॅटसप, कुटूंब ॲप व इतर सोशल मीडिया वरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
close