shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित मागणीच्या संदर्भाचे दिले निवेदनपत्र .

 चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित मागणीच्या संदर्भाचे दिले निवेदनपत्र . 


 प्रतिनिधी : बारामती येथे भारतीय जनता पार्टीचे  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने प्रलंबित मागणीच्या संदर्भाचे निवेदन  ६ सप्टेंबर रोजी देण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा भाजप शिक्षक आघाडीचे अध्यक्ष संतोष कदम, इंदापूर तालुका भाजप शिक्षक आघाडीचे अध्यक्ष शंकर हुबाले, उपाध्यक्ष पन्हाळकर सर,  अर्जुन भोंग व शिक्षक आघाडीचे जिल्हा प्रतिनिधी व्यवहारे सर, प्राध्यापक वीर सर, माने सर, गडदे सर, संदीप पवार सर,  गलांडे सर इत्यादी शिक्षक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदन पत्रात नमूद केले आहे की, आपण शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर करण्यात यावे - मागण्या पुढील प्रमाणे.१) जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी.२). घोषित अघोषित व मूल्यांकनास पात्र प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या तसेच नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याबाबत.३). शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० आश्वासित प्रगती योजना लागू करवी.४). शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाची तात्काळ अंमलबजावणी करणे बाबत व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची पदभरती करावी.५) कॅशलेस मेडिक्लेम योजना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची प्रत्यक्ष कार्यवाही करावी.६.शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक कामे न देण्याबाबत.८. एक नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तात्काळ सुरू करावे.

close