shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी करणार-आमदार नितेश राणे..!!

श्रीरामपूर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी करणार-आमदार नितेश राणे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ११ सप्टेंबर २०२२
     
श्रीरामपूर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी करणार-आमदार नितेश राणे..!!

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील भाेकर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे हा युवक मुस्लिम युवतीशी लग्न केल्यानंतर आज तागायत बेपत्ता आहे.या प्रकरणी श्रीरामपूर पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.या सर्व प्रकरणाची दखल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी घेतली आहे.दीपकचा शाेध लावण्यात पाेलिसांना यश आलेले नाही.
      यावेळी भाजप आमदार राणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथे जनआक्राेश माेर्चाचं आयाेजन करण्यात आलं हाेतं.मा.आदिवासी मंत्री आमदार डाॅ.अशाेक उइके हे देखील माेर्चात हाेते.श्रीरामपूरच्या अतिरीक्त पाेलिस अधीक्षक कार्यालयावर हा माेर्चा नेण्यात आला.भाजप आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर तालुका दौऱ्यावर येत राज्यात कडवट हिंदुत्ववादी सरकार आहे, अधिकाऱ्यांनी हे लक्षात घेऊन काम करावे,असा इशारा देत उद्धव ठाकरेंसह इतर माजी मंत्र्यांवर निशाणा साधाला.महाराष्ट्राचा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक नाही,अहमदनगरचा पालकमंत्री हसन मुश्रीफ नाही. उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री राहिले नाहीत.याकडे लक्ष देत अधिकाऱ्यांनी नीट काम करावे.यावेळी अहमदनगर येथे शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणे म्हणाले की मी येणार म्हणून येथील पाेलिस निरीक्षक सुटीवर गेलाय पण ताे कधीपर्यंत सुटीवर जाईल त्याला माझ्याशी बाेलायलाच लागेल हे त्यानं लक्षात ठेवावं.हे हिंदुत्ववादी सरकार आहे.तसेच हिंदूंवर अशाप्रकारे दबाव टाकला जातोय हे खपवून घेतले जाणार नाही? पाच आरोपी ताब्यात घेतले असताना अजून दीपक बर्डे हा पोलिसांना सापडत कसा नाही असा प्रश्न उपस्थित होतोय 
यावेळी राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर पोलिसांच्या तापासा बाबतीत संताप व्यक्त केला.

       तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या कडे करणार आहोत असे आमदार नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक भैय्या गंधे,मा.महापौर बाबासाहेब वाकळे,नगरसेवक रवींद्र बारस्कर,बाबा सानप,भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

 

close