तात्काळ कारवाई करा - ढूस
रहुरी - दि. ६ सप्टेंबर
खोट्या निवेदनाद्वारे राहुरीच्या तहसिलदारांची दिशाभूल करून पोलीस खात्याची व आमच्या कुटुंबाची बदनामी केली म्हणुन संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अर्जुन ढूस यांनी राहुरीच्या निवासी नायब तहसिलदार संध्या दळवी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
ढूस यांनी निवेदनात पूढे म्हंटले आहे की, दिनांक 19/8/22 रोजी विधवा महिलेचा हात धरून ओढले व माझ्या बरोबर गावात चल असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केल्यप्रकरणी देवळाली प्रवरा येथील भाऊसाहेब एकनाथ हरिचंद्रे याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात दिनांक 20/8/22 रोजी सी आर पी सी 796/22 अन्वये कलम 354 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा नोंद झाली आहे.
या भाऊसाहेब एकनाथ हरिचंद्रे याने दि. 29/8/22 रोजी राहुरी तहसील कार्यालयास लेखी निवेदन देऊन खोटे गुन्हे मागे घेणे बाबत पत्र दिले आहे. त्या पत्रामध्ये सदर विधवेचा उल्लेख "सौभाग्यवती" असा करून जाणीवपूर्वक तिच्या वैधव्यावर बोट ठेवून तिचे मानसिक हनन केले आहे. तसेच मागून कमरेला धरले.. छेडछाड केली.. असे तिच्या फिर्यादीत नसलेले शब्दप्रयोग करून राहुरीच्या तहसिलदार साहेब यांना खोटी व चुकीची माहिती देवून प्रशासनाची दिशाभूल केली आहे.
तसेच भाऊसाहेब एकनाथ हरिचंद्रे याने त्याच्या निवेदनात दिपाली हि त्याची मुलगी असल्याचा दावा केला आहे. वास्तविक पाहता दिपाली ही भाऊसाहेब हरिचंद्रे याची मुलगी नाहीच. त्या कामी तिचे आधार कार्ड व रेशन कार्ड तसेच शाळा सोडलेचा दाखला तपासावा. म्हणजे तहसिलदार साहेबांना खोटी माहिती देऊन त्याची वृत्तपत्रात सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी आणि आमची बदनामी करणेसाठी या निवेदनाचा स्टंट केला असल्याचे ढूस यांनी दिलेल्या निवेनात म्हंटले आहे.
सीआरपीसी 796/22 अन्वये कलम 354 प्रमाणे राहुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेली फिर्याद व त्यामधील सर्व शब्द आणि तहसिलदार साहेबांना भाऊसाहेब हरिश्चंद्रे याने दिलेल्या निवदना मधील उल्लेख तसेच निवेदनातील त्याची नसलेली मुलगी दीपाली हिचे माहेरचे आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच शाळा सोडल्याचा दाखला तपासून खात्री करावी. व प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक करून वृत्तपत्रातून आमची बदनामी करून विनयभंगाचा गुन्हा मागे घेनेसाठी आमचेवर दबाव निर्माण केला म्हणून भाऊसाहेब एकनाथ हरिचंद्रे रा. देवळाली प्रवरा तालुका राहुरी याचेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती अर्जुन ढूस यांनी निवेनाचे शेवटी केली आहे.
या निवेनाद्वाच्या प्रती अहमदनगर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व राहुरीचे पोलीस निरीक्षक यांना दिले असून या प्रकरणी ढूस यांनी नुकतीच जिल्हा पोलिस अधिक्षक यांची अहमदनगर येथे समक्ष भेट घेतली असल्याचे समजते.

