shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोषण आहार सप्ताह साजरा...


अमरावती - आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन तथा राष्ट्रीय पोषण सप्ताह 2022(1ते 7 सप्टेंबर)औचित्य साधून संस्थेचे प्राचार्य मा.डॉ.डवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कुपोषण व पोषण आहार या विषयावर विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
मुख्य स्पर्धांमध्ये मध्ये वक्तृत्व  व चित्रकला स्पर्धा मध्ये प्रशिक्षण केंद्रतील सर्व प्रशिक्षणार्थीनी भाग घेतला. मा. प्राचार्य व परीक्षकांनी मूल्यांकण करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांचे प्रशस्ती पत्र देऊन प्रोत्साहीत केले.तसेच मा. प्राचार्य डॉ. डवले सर, श्री डांगे सर व शर्मा मॅडम यांनी कुपोषण व पोषक आहार, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य व दयावयाचे योग्य आरोग्य शिक्षण या विषयी सविस्तर माहिती प्रशिक्षणार्थी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांना देण्यात आली. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य पर्यवेक्षक तथा प्रशिक्षण समन्वयक श्री.डोंगरे सर,श्री.देशमुख सर,शर्मा मॅडम व आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथील अधिकारी,प्रशिक्षणार्थी व सर्व कर्मचारी सहभागी होते.
close