shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश मूर्ती समोर महिलांचा नाच करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई करावी


प्रतिनिधी :सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ६/ गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये गणेश मुर्तीसमोर विभत्सपणे महिलांचा नाच काही मंडळे करणार आहेत ते न करू देणे व केल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपा सरचिटणीस सुहास घोलप, बजरंग दल चे संतोष वाळुंजकर, राष्ट्रीय पत्रकार संघाचे नितीन घोडेगावकर यांनी निवेदनाद्वारे करमाळा पोलीस निरीक्षकांना केली आहे. 

करमाळा शहर तसेच तालुक्यात गणपती विसर्जन मिरवणूकीत काही मंडळे त्या महिलांना बोलावून गणेश मुर्ती पुढे विभत्सपणे नाच करणार आहेत असे समजते. सदर प्रकारणे देव - देवता, धार्मिक तसेच सामाजिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केला जाणार असून त्यावेळी काही व्यक्ती मद्यप्राशन करीत असतात आणि गणेश मुर्तीपुढे त्या महिलांसोबत नाही - नाही ते अश्लिल प्रकार करीत नाच करतात. हा सर्व प्रकार सामाजिकदृष्ट्या अत्यंत किळसवाणा व निर्लज्यपणाचा आहे. यामुळे आपली पिढी तर बरबाद होतच आहे. परंतु समाजातसुध्दा चुकीचे संदेश जात आहेत. तसेच महिल ह्या फक्त खेळाच्या बाहुल्या आहेत. त्यांना आपण कसेही नावचू वा वागवू शकतो हाच प्रचार या माध्यमातून होऊ शकतो असे असतानाच धार्मीक मुद्दा असल्याने धार्मिक दंगलीसुध्दा उध्दभवण्याचा प्रसंग निर्माण होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

गणेश विसर्जन मिरवणूक पारंपारिक पध्दतीनेच काढावी. याने पारंपारीक सुंदरता व संस्कृती अबादीत राहून समाज सलोखा राहणार आहे. तरी आपण सुज्ञ आहात या प्रकाराची सर्व चौकशी करून त्या महिलांचा नाच थांबवावा व जी मंडळे असे नाच करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तरी आमच्या धार्मीक भावनेचा विचार करून आपण त्वरीत चौकशी करावी अन्यथा आम्हांस कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलने करावी लागतील याची नोंद घ्यावी. असे म्हटले आहे.

*सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा, तहसीलदार करमाळा यांनाही पाठविले आहे*
close