पी.बी.पायमोडे टाकळी ढोकेश्वर :-
येथील प्र .ग. खिलारी विद्यालयात शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंतीनिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी अपंग केंद्राचे संचालक मा. सरपंच रावसाहेब झावरे सर होते.यावेळी नगर अर्बन बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन मा.अशोकशेठ कटारिया यांचा सत्कार विद्यालयातर्फे करण्यात आला.
या कार्यक्रमाला चार्टर्ड अकौंटट मा.प्रविणशेठ कटारीया,उद्योजक किसनशेठ गागरे,प्रा. सुनिल खिलारी,मा.ज्ञादेवराव पांडुळे,विभागीय अधिकारी मा.तुकाराम कण्हेरकर, प्रा.गोडे सर,महेश पाटील,श्रावण गायकवाड,बबनराव गायखे,प्रकाश इघे,शाळा समिती चेअरमन पंडितराव झावरे,अशोक जाधव सर, प्रा.किसनराव पायमोडे,बाबासाहेब बांडे, तुषारशेठ जपकर, ऋषिकेश पांडुळे,मीराबाई दातीर,प्रा.लगड मॅडम ,संदिप व्यवहारे,अर्जुन रोकडे, संदिप निकम, भिमराज रोकडे,अनिल रांधवन, भगवंत शिंदे,संजय दिवटे,शंकरराव माने,संदिप दरेकर, देविदास खेडकर,एकनाथ झावरे, वैभव पांगरे, जनार्धन गरड यांसह पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या महान कार्याची माहिती प्रा.गोडे सर व विद्यार्थिनी अपेक्षा टेकुडे हिने दिली.
सदर कार्यक्रमात उद्योजक किसनशेठ गागरे यांनी सामाजिक जाणिव,शिक्षण दातृत्व उत्तराईतून 1 लक्ष रुपयांचा धनादेश विद्यालयाच्या विकास कार्यासाठी दिला.तसेच प्रविण शेठ कटारिया यांनी ट्रस्ट मार्फत विद्यालयास स्कुल बस देण्याचे आश्वासन दिले. प्राध्यापक सुनिल खिलारी यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यालयास 51 हजार रु देणगीचा चेक दिला.अशोकशेठ कटारिया यांनी विद्यालयास येथुन पुढील काळात काहीही कमतरता पडू देणार नाही असे आश्वस्त केले. रावसाहेब झावरे सरांनी पाच हजार रुपयांची देणगी दिली .बाबासाहेब बांडे यांनी तीन हजार एक्कावन रुपये दिले.
दहावी एप्रिल 2022 मधील गुणवंत विदयार्थ्यांना देणगीदारांच्या देणगीतून बक्षीस वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थी सन्मान करण्यात आला.तुषार शेठ जपकर यांनी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यार्थ्यांना भोजन दिले. सचिनशेठ सोनावळे यांनी टिपरी पथकास कुर्ते दिले.भगवानशेठ वाळूंज यांनी झांज पथकास तर तुषारशेठ जपकर यांनी लेझीम पथकास टी शर्ट भेट दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री ढुस यांनी केले.सूत्रसंचालन सौ.ठुबे मॅडम यांनी तर स्वागत श्री रोकडे सरांनी केले .सुनिल शिंदे सरांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.

