shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या वतीने इंदापूर शहरामध्ये कर्मवीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या वतीने इंदापूर शहरामध्ये कर्मवीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
 इंदापूर प्रतिनिधी:रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या वतीने आज रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची इंदापूर शहरातून  सवाद्य रथातून मिरवणूक काढण्यात आली. सकाळी आठ वाजता विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यालयाच्या शाळा समितीचे सदस्य डॉ. श्रेणिक शहा, डॉ. लहू कदम, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, दादासाहेब सोनवणे, विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे, पर्यवेक्षक विजय शिंदे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस सुरुवात झाली. 
विद्यालयातील साडेसातशे विद्यार्थी व शिक्षक तसेच अनेक माजी विद्यार्थी व विद्यालयावर प्रेम करणारे नागरिक या मिरवणुकीमध्ये  सहभागी झाले. जागोजागी ,चौकामध्ये अनेकांनी कर्मवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. या मिरवणुकीत विद्यालयातील विद्यार्थिनींचे झांज पथक व लेझीम पथक यांनी रंगत  आणली.विद्यालयातून निघालेली मिरवणूक ही  रामवेस -पोरा पोरांची चावडी -आंबेडकर नगर -कासारपट्टा -नेहरू चौक- खडकपुरा- शेख मोहल्ला -संभाजी चौक- या मार्गे विद्यालयात दाखल झाली.३ तास सुरू असलेल्या मिरवणुकीत कर्मवीर भाऊराव पाटील व रयत शिक्षण संस्था नावाचा गजर करत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इंदापूर शहर दुमदुमून सोडले. विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कै. धनंजयबापू वाशिंबेकर ट्रस्टच्या वतीने गोड खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी चॉकलेट वाटप केले.मिरवणूक यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
close