shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी तालुक्यात लम्पी आजाराचा उद्रेक ११ हजार जनावरांना दिली लस..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. शुक्रवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२२

राहुरी तालुक्यात लम्पी आजाराचा उद्रेक ११ हजार जनावरांना दिली लस..!!

राहुरी : राहुरी तालुक्यातील पशू वैद्यकीय अधिकारी डॉ अमरप्रसाद माने यांनी सांगितले की, मानोरी , मुसळवाडी, गावांमध्ये प्रत्येक जनावरे लम्पी आजाराने बाधीत असल्याचे आढळले. तालुक्यातील तीन गावामध्ये तब्बल २० ते २५ जनावरे हि लम्पी या आजाराने बाधीत झाल्याचे पशू(पालकांमध्ये) मालकांमध्ये निराशाजनक चित्र दिसत आहे.दरम्यान पशू वैद्यकीय अधिकारी, विभागाने,आजाराची तातडीने दखल घेत पाच किलोमीटर अंतरातील ११ हजार जनावरांना तातडीने लसीचे नियोजन करून जनावरांना लस दिली. ‌  
  पशू वैद्यकीय विभागाने जनावरांच्या स्वच्छतेकडे काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. 
   
         अहमदनगर जिल्हयात लम्पी आजाराने थैमान घातला आहे. जनावरांच्या बाजारावर बंदी लावल्यावर गावो गावी तपासणी व लस टोचणीची मोहीम पशू वैद्यकीय विभागाने सुरू केली आहे. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ अमरप्रसाद माने यांनी सांगितले कि मिश्रण तयार करून फवारणी केली पाहिजे ,करंज व निम तेल एकत्र करीत त्यामध्ये साबण किंवा शैम्पू टाकत मिश्रण तयार करावे. मिश्रण तयार करून घेतल्यावर झालेल्या दृव्याची फवारणी जनावरे व परिसरातील विभागात फवारणी करावी. डास, मच्छर आणि गोचीड संख्या कमी होईल अशी सविस्तर माहिती दिली.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600       
close