शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२२
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी पत्रकार अक्षय करपे यांची निवड..!!
राहुरी : आरोग्य धनसंपदा फाउंडेशनच्या राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी पत्रकार अक्षय करपे यांची निवड आरोग्य धनसंपदा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री जितेंद्र केवलसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील बेधडक स्वतंत्र मुक्त निर्भिंड लेखनीसाठी प्रसिद्ध असलेले पत्रकार म्हणून अक्षय करपे यांची ख्याती आहे.
आपल्या बेधडक पत्रकारितेतून गोरगरीब अन्यायग्रस्त वंचित घटकांना ते नेहमीच न्याय मिळवून देण्यासाठी पुढे असतात.
त्यांच्या कार्याची दखल घेत राहुरी तालुक्यातील गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया किंवा आरोग्याच्या सर्वरोग निदान समस्या सोडवून नागरिकांना आरोग्य प्राप्त करुन मदत मिळवून देण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. समाजातील असे अनेक रुग्ण असतात ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या आरोग्याची निदान करता येत नाही यासाठी आरोग्य धनसंपदा फाउंडेशन नामांकित मोठ्या हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात अथवा मोफत शस्त्रक्रिया रुग्णांच्या करत असतात.
आरोग्य धनसंपदा फाउंडेशनच्या वतीने देशभरात अनेक रुग्णांवर नामांकित मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन आरोग्य प्रदान करण्यात आले आहे. याचे सर्व श्रेय धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र केवलसिंग पाटील तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना जाते.
आरोग्य धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्षांनी म्हटले आहे की पत्रकार अक्षय करपे यांनी आपल्या परिसरातील तालुक्यातील अथवा जिल्ह्यातील ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे ज्यांचे पार्ट निकामी झाले आहेत व त्यांना पैशाअभावी दवाखान्यात जाता येत नाही अशा रुग्णांना संपर्क करून त्यांना एक नविन आरोग्य प्राप्त करून देण्यासाठी मदत करायची आहे.
यासाठी पत्रकार अक्षय करपे यांची आरोग्य धनसंपदा फाउंडेशनच्या राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

