shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्तुत्य उपक्रम...देवळाली प्रवरा येथे एकल महिलांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२२

स्तुत्य उपक्रम...देवळाली प्रवरा येथे एकल महिलांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती..!!

देवळाली प्रवरा : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे आज दि ८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एकल महिला पुनर्वसन समीतीचे राहुरी तालुका अध्यक्ष तथा प्रहार जनशक्ति पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांच्या पुढाकाराने व स्वराज ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे वतीने १३ एकल (विधवा) महिलांच्या हस्ते श्रीगणेशाची सामूहिक आरती करण्यात आली.
      या प्रसंगी एकल महिला पुनर्वसन समितीचे सचिव प्रशांत कराळे, प्रसिध्दी प्रमुख तथा केंद्र शासनाचा राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, स्वराज ग्रूप गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष वाळुंज अक्षय गिताराम, उपाध्यक्ष दळवी अविनाश शंकर, सचिव शिंदे स्वप्निल गंगाराम, कराळे अक्षय बाबासाहेब, वरघुडे सौरभ सुभाष, वरघुडे सनी सुभाष, शेळके गौरव नंदू, दिवाण ओंकार श्रीकांत, पठारे शुभम दिनकर, आजबे चंद्रकांत कचरू, गांधी धीरज अशोक, वरघुडे तनेश भारत आदी सदस्य व मोठ्या संख्येने महीला भगिनी उपस्थित होते.
       समाजात आजही एकल महिलांना मनाच स्थान मिळत नाही. कुटुंबप्रमुख गमावलेल्या एकल महिला भगिनी यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यांचे दुःख कमी व्हावे आणि समाजात त्यांचा सन्मान करण्यात यावा या हेतूने आप्पासाहेब ढूस यांनी स्वराज ग्रुपच्या माध्यमातून हे कार्य घडवून आणले. यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

    प्रसंगी स्वराज ग्रूप चे आभार व्यक्त करून एकल महिलांना सर्वच कार्यात असाच सन्मान मिळावा अशी उत्स्फर्त प्रतिक्रिया आरतीसाठी आलेल्या एकल महिलांनी दिली. 

     आरती करतांना एकल महिला भगिनिंच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते हे बघून खूप समाधान वाटले आनंद झाला अशी प्रतिक्रिया पत्रकार शिवाजी घाडगे यांनी दिली.
      प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढूस म्हणाले की, एकल भगिनींना सन्मानित करून त्यांना समाज्याच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे, त्यासाठी विधवांचा सन्मान करून जुन्या अनिष्ट रूढी परंपरांना फाटा देणे गरजेचे आहे. स्वराज ग्रूप गणेश उत्सव मंडळाने आमचे विनंतीस मान देवून हा स्तुत्य उपक्रम राबविला त्याबद्दल ग्रूपच्या सर्व पदाधिकारी यांचे हार्दिक आभार.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close