shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विठामाई सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न..!

शौकतभाई शेख । श्रीरामपूर :-
 तालुक्यातील वांगी खुर्द येथील विठामाई विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेची सन २०२१-२२ सालची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन बाबासाहेब चिमणराव गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी श्री.गायकवाड म्हणाले की, अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीची दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. 

संस्थेने जवळपास १ कोटी कर्जवाटप केले असून त्यापैकी ९० टक्के वसूली झाली आहे. अहवाल सालात संस्थेला सुमारे रु. ४ लाख नफा झाला असून संस्थेचा ‘ब’ वर्ग आहे. यंदा दीपावली सणानिमित्त सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप करणार असल्याचे जाहीर केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभेच्या प्रारंभी अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक सोपानराव गायकवाड यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन सौ.लताबाई देवकर, पोलीस पाटील दिनकरराव गायकवाड, भगत राऊत, ज्ञानेश्वर गायकवाड,अंबादास गायकवाड, अशोक मेकडे, सर्जेराव गायकवाड, अनशाबापू कदम, बिरु पिसाळ, रामभाऊ पवार, दत्तात्रय देवकर, अशोकराव गायकवाड, कारभारी बिडगर, पारसनाथ माने, नानासाहेब येवले, शिवाजी गायकवाड, मारुती देवकर, संदीप कोळसे, संतोष गायकवाड, शिवाजी वाघमोडे, अशोक शिंदे, बाबासाहेब शिंदे, गंगाराम शेंडगे, शिवाजी बिडगर यांचेसह सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संस्थेचे सचिव दशरथ पिसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
close