इंदापूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी गोकुळदास शहा यांचे दुःखद निधन.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि कर्मयोगी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष तथा स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांचे खंदे समर्थक गोकुळदास विठ्ठलदास शहा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी आज सकाळी ७ वाजता निधन झाले आहे. गोकुळदास शहा यांच्या दुःखद निधनाने इंदापूरतालुक्या वर शोककळा पसरली आहे.
गोकुळदास शहा यांची शहा ब्रदर्स कंपनी तसेच शैक्षणिक, सामाजिक, व्यवसायिक या क्षेत्रामध्ये त्यांची भरीव कामगिरी असून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना तसेच इंदापूर शहरातील विविध संस्थेला त्यांचे मोठे योगदान लाभले होते.
गेल्या महिन्यापूर्वीच गोकुळदास शहा यांच्या पत्नी शकुंतला शहा यांचे निधन झाले होते . शहा कुटुंब या दुःखातून सावरत असतानाच दुसरे दुःखद घटना
आज गोकुळदास शहा यांच्या निधनाने शहाकुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अंकिताताई शहा, तसेच कर्मयोगी कारखान्याची उपाध्यक्ष भरत शहा, मुले, मुली, सुना ,पुतणे ,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

