shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अबब ! किती मोठा हा अजगर ...! नगरमधे आढळून आला प्रचंड मोठा अजगर

प्रतिनिधी : सचिन गांधी

नगर : १० /   नगर येथील भिंगार रोड येथे बेलेश्वर म्हणून महादेवाचे मंदिर आहे . या बेलेश्वर रोड ला काल रात्री साधारण १२ वाजता तीन ते चार तरुण आपले रोजंदारीचे काम आटोपून दुचाकीवरून घरी निघाले असता त्यांना अचानक रस्त्याच्या एका बाजूने एक प्रचंड मोठा अजगर
दिसून आला .

 एवढा मोठा अजगर पाहून हे युवक घाबरून गेले होते . मात्र अजगर शांतपणे रस्त्यावरून दुसऱ्या बाजूला असलेल्या झाडीमधे निघून गेला . येथील स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला असता त्यांनी हा अजगर या आधी येथील भागात कधी पाहिला नसल्याचे सांगितले .

त्यामुळे नगरच्या बेलेश्वर भागात हा अजगर आढळून आल्याने येथील स्थानिक रहिवाशी व नागरिकांनी  काळजी घ्यावी असे सांगण्यात येत आहे .
close