हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२०,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने लातुर येथील प्रणवश्री मंगल कार्यालयात दि.१७ व १८ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार व समितीचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले.यावेळी सामाजिक कार्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यां तथा समितीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष सनाताई रफीक शेख यांना "सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्कार"देऊन गौरविण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा समितीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष सनाताई शेख यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष एवम ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील तिळभाट या गावी स्वातंत्र्य मिळाले त्या काळापासून असलेली पाणीटंचाई सतत विविध आदोंलनाच्या माध्यमातून पाणीटंचाई दुर करुन तिळभाट या गावी नळयोजेनेव्दारे पाणी मिळवुन दिल्याबद्दल त्यांना समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खंडापुरकर यांच्या हस्ते "सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्कार" प्रदान करुन गौरविण्यात आले व त्यांची महाराष्ट्र राज्य युवती प्रदेशाध्यक्षा पदी नियुक्ती करुन नियुक्तीपत्र दिले.
यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अनिल नानजकर,राष्ट्रीय समन्वयक गिरीराज सर,जम्मु कश्मिरचे प्रदेशाध्यक्ष आर.सि.शर्मा,राष्ट्रीय महिला अध्यक्षा डाँ.कविता रायजादे,राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा शोभाताई बल्लाळ,महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष अरुण चव्हाण-देशमुख,महिला प्रदेशाध्यक्षा अँड.राणीताई स्वामी,राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य पृथ्वीराज सिंह पाटील खंडापुरकर,मराठवाडा विभागीय महीला कार्याध्यक्षा योगिताताई ठाकुर,मिडीया प्रदेशाध्यक्ष संतोष ठाकरे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके, मराठवाडा विभागीय महिला अध्यक्षा विजयाताई,नाशिक जिल्हाध्यक्ष शिवानंद आप्पासाहेब,नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख कवाडे बाबा,हिंगोली महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई थिट्टे,किसान विभाग शंकरराव देशमुख,हिंगोली जिल्हा प्रसिध्दीप्रमुख तथा पत्रकार विश्वनाथ देशमुख सह नाशिक जिल्हा पदाधिकारी व इतर जिल्ह्यातील पदाधिकारी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


