हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२०,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने लातुर येथील प्रणवश्री मंगल कार्यालयात दि.१७ व १८ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार व समितीचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले.यावेळी सामाजिक कार्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके यांना "सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्कार"देऊन गौरविण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत दौलतराव तिडके यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष एवम ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या माध्यमातून मागील चार वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत भ्रष्टाचार निर्मूलन,अन्याया विरोधात लढा देत समाजसेवा करीत असल्याने या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खंडापुरकर यांच्या हस्ते "सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्कार" प्रदान करुन गौरविण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अनिल नानजकर,जम्मु कश्मिरचे प्रदेशाध्यक्ष आर.सि.शर्मा,राष्ट्रीय महिला अध्यक्षा डाँ.कविता रायजादे,राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा शोभाताई बल्लाळ,महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष अरुण चव्हाण-देशमुख,महिला प्रदेशाध्यक्षा अँड.राणीताई स्वामी,राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य पृथ्वीराज सिंह पाटील खंडापुरकर,मराठवाडा विभागीय महीला कार्याध्यक्षा योगिताताई ठाकुर,युवती प्रदेशाध्यक्षा सनाताई शेख, मिडीया प्रदेशाध्यक्ष संतोष ठाकरे,मराठवाडा विभागीय अध्यक्षा विजयाताई,हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे,हिंगोली महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई थिट्टे,किसान विभाग शंकरराव देशमुख,हिंगोली जिल्हा प्रसिध्दीप्रमुख तथा पत्रकार विश्वनाथ देशमुख,वसमत तालुका संघटक रमेश सावळे,सेनगांव तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे,सखाराम आकले,प्रकाश जोगदंड सह हिंगोली जिल्हा पदाधिकारी व इतर जिल्ह्यातील पदाधिकारी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने पंडीत तिडके यांचे सर्व पदाधिकाऱ्यांतुन अभिनंदन होत आहे.


