shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर चा देखावा....! अहमदनगर जिल्ह्याचा विकास झाला का फक्त नेत्यांचा विकास झाला हे आता जनतेनेच ठरवायचे...?


अहमदनगर जिल्हा भौगोलिक दृष्टीने मोठा जिल्हा.. गेली चाळीस वर्षे अहमदनगर ला अनेक मंत्री होऊन गेले व आहेत त्यातली काही नावे
*कै रामराव आदिक
*कै गोविंदराव आदिक
*कै बाळासाहेब विखे
*कै शंकरराव काळे
*कै दिलीप गांधी
*कै शंकरराव कोल्हे
*कै अनिल राठोड
*कै बी जी खताळ
*श्री मधुकर पिचड
*श्री बाळासाहेब थोरात
*श्री बबनराव पाचपुते
*श्री शंकरराव गडाख
*श्री प्राजक्त तनपुरे
*श्री राम शिंदे
*श्री राधाकृष्ण विखे

सगळ्यांना तगडी खाती होती.. पण गेल्या चाळीस वर्षात अहमदनगर ची प्रगती काय? जिल्ह्यातील एक तरी रस्ता चांगला आहे काय? जिल्ह्यात औद्योगिक वसाहती ची स्थिती काय..? बस स्टॅण्ड ची परिस्थिती काय.. ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर तरी आहे काय? गुन्हेगारी, वाळू तस्करी यामध्ये अहमदनगर चे नाव कुठे आहे.

शेजारी नाशिक ला एक भुजबळ आले तर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला.. पुण्याची परिस्थिती तीच.. मग अहमदनगर ला च काय झाले..?
आपले मंत्री मंत्रीपदा साठी पक्ष बदलतात आणि आपण विकास काहीच झाला नाही तरी बिनधास्त ते सांगतील त्याच चिन्हाचे बटन डोळे झाकून दाबतो.. पक्ष बदलून त्यांना खाते बदलून मिळतात .. आमचं काय? कधी कंबरा बरोबर मानेचे दुखणे फ्री..!

जिल्ह्यात सतरा साखर कारखाने .. हे गेली अनेक वर्षे भाग विकास निधी कापत होते.. चाळीस वर्षांपासून यांनी हजार कोटी खर्च केले असतील.. पण आपल्या भागाच्या विकासाचे काय..?

मी (संजय भास्करराव काळे) आज कोपरगाव अहमदनगर रस्त्यावर प्रवास केला.. ह्या रस्त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान शिर्डी साईबाबा संस्थान आहे. ‌ज्या शिर्डी संस्थान ला जगभरातील भाविक मोठ मोठया देणग्या देऊन जातात. कळसाला, समाधीवर सोन्याच्या मुलामा परराज्यातील भाविक देतात. 

पण मला गेल्या चाळीस वर्षात आपल्या नेत्यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे सलग एक वर्ष तरी चांगल्या रस्त्यावर प्रवास केल्याचे आठवत नाही.. मग सगळे मंत्री नेमके काय काम करीत होते.. यांच्या मंत्रीपदाचा जिल्ह्याला काय उपयोग झाला..? याचा अहमदनगर जिल्ह्यातील जनतेने खरच विचार करावा.हीच अपेक्षा...!

सामाजिक कार्यकर्ते:-
संजय भास्करराव काळे
कोपरगाव

close