shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पायी प्रवास करणाऱ्या युवा सैनिकाचा प्रविण कोकाटेंनी केला सन्मान ; चिचोंडी च्या शिवसैनिकांनी केले स्वागत


प्रतिनिधी : सचिन गांधी

चिचोंडी पाटील : ३ / नांदेड ते मातोश्री( मुंबई )पायी प्रवास करणाऱ्या युवा सैनिक साईराम कनकुंटवार यांचे चिचोंडी पाटील येथे  मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे व शिवसैनिकांतर्फे स्वागत करण्यात आले. 

शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात शिवसैनिकांनी खचून न जाता पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश घेऊन किनवट,जिल्हा नांदेड येथून युवासैनिक साईराम कनकुंटवार हे मातोश्री (मुंबई)पर्यंत पायी प्रवास करणार आहेत.या प्रवासादरम्यान कनकुंटवार आज चिचोंडी पाटील तालुका नगर या ठिकाणी आले असता त्यांचे शिवसैनिक व चिचोंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे व शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले व सत्कार केला तसेच त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शिवसेना नेते डॉ.मारुती ससे,दत्तात्रय हजारे,चेअरमन महादेव खडके,पंडितराव कोकाटे,सुरेश ठोंबरे, विठ्ठलदेवा कोकाटे,रामदास कोकाटे, पै.राजूभाऊ कोकाटे,भाऊसाहेब वाडेकर,संजय पवार,फारुक सय्यद, विश्वसागर कोकाटे,गणेश वाडेकर, प्रशांत कांबळे,जयसिंग दळवी, महादेव खडके,बाबासाहेब शेंडकर, भगवान पवार,बाबासाहेब खडके,अशोक कोकाटे,रघुनाथ कोकाटे,प्रशांत मुटकुळे,नानासाहेब कोकाटे,अमोल काकडे आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
close