शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
मुंबई:- महाराष्ट्रात धडाकेबाज काम करणारे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले व प्रहार संघटनेचे प्रमुख नेते व माजी मंत्री बच्चु कडू यांनी मंत्रालयात अधिकार्यांसोबत वाद घातल्या प्रकरणी कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी बच्चू कडूंना ताब्यात घेतले असून वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेले आहे. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या मंत्रालयीन संघटनेने केला होता.
सदर प्रकरण कोर्टात चालू असताना या प्रकरणी आज बच्चू कडू गिरगांव कोर्टात हजर झाले. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
मरीन लाईन पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं असून वैद्यकीय चाचणीसाठी रवाना झाले आहे. जेजे रुग्णालयामध्ये त्यांना घेऊन जाणार आहे. (अनिल देशमुखांचे 'घरवापसी'चे दोर कापले, राज्य सरकारने CBI ला दिली संमती) दरम्यान, बच्चू कडू न्यायालयीन कोठडी प्रकरणामध्ये गिरगांव कोर्ट न्यायाधीश पटेल यांनी आपले विशेषाधिकार वापरण्यास नकार दिला. हे अधिकार वापरून त्यांना जामीन मंजूर करता आला असता,.
मात्र,सेशन कोर्टात त्यांनी केस हस्तांतरीत केली आहे. आता काय होऊ शकतं ? गिरगांव कोर्ट न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली. आता बच्चू कडू यांचे वकील सेशन कोर्टात,जामिनासाठी अर्ज सादर करतील. सेशन कोर्टामध्ये बच्चू कडू यांना जामीन मिळू शकतो.
काय आहे प्रकरण ? 30 मार्च 2016 रोजी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता, 30 मार्च 2016ला दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता, मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालयातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तेव्हा सरकारी अधिकारी संघटनांनी दिला होता.
बेकायदा काम करून घेण्यासाठी कडू हे गावित यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केला होता. या घटनेकडे काँग्रेसचे सदस्य सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. 'राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे', असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं होतं. मात्र आपण त्या अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा कडू यांनी केला होता. अखेर,संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

