shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनैद फैसल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोर्शी येथे अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिर संपन्न...!



मोर्शी- इंटमोलॉजिस्ट या विषयात पी एच डी असणारे व ज्यांचे स्वप्न की, जिल्हा लवकरच हायड्रोसील मुक्त व्हावा  याकरिता  सतत मागील 3 वर्षांपासून परिश्रम घेऊन जवळपास 90% उद्दिष्टे पूर्ण करणारे व सकारात्मक दृष्टीने अत्यंत मनापासून पुढे पाऊल टाकून प्रयत्न करणारे  आपले  सर्वांचे सहकारी मित्र हत्तीरोग अधिकारी *डॉ जुनेद सर यांच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने* आज उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे भव्य हायड्रोसील कॅम्प चे आयोजन हत्तीरोग निर्मूलन पथकाचे नियोजन कर्ते श्री प्रविण चकुले , प्रकाश दातीर व सुधाकर चोपकर यांनी केले. या प्रसंगी क्षेत्रिय संचालक कार्यालय पुणे येथील राज्य किटकशास्त्रज्ञ श्री बाळासाहेब माने उपस्थित होते.

अमरावती जिल्हा हायड्रोसील मुक्त करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले अकोला विभागाचे आपले सहाय्यक संचालक (हिवताप) डॉ कमलेश भंडारी सर  व मोलाची पाठपुरावा भूमिका ज्यांच्या सहकार्य शिवाय जिल्हा हायड्रोसील मुक्त शक्य नव्हते असे नवीनच लाभलेले जिल्ह्यातील  शल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदळे सर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले सर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ जोगी सर यांच्या नियमित सभेतील पाठपुरावाने ह्या कॅम्प यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच शिबिरामध्ये श्री.सचिन कोरडे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मोर्शी यांचे नियोजन करण्यात मोलाचे सहकार्य लाभले.

आज कॅम्प करिता *29* रुग्ण भरती करण्यात आले त्यापैकी *12* रुग्णावर यशस्वी शस्तक्रिया करण्यात आली. *9* रुग्णांची शस्त्रक्रिया ही गुंतागुंतीची असल्याने त्यांना सामान्य रुग्णालय, अमरावती येथे पाठविण्यात येणार असल्याचे सर्जेन डॉ संतोष राऊत व त्यांच्या टीम मधील सर्जन डॉ राजेंद्र नेमाडे व डॉ भूषण ठाकरे यांनी सांगितले तर *8* रुग्ण हे हर्निया चे असल्याने त्यांना अपात्र करून अमरावती येथे शस्त्रक्रिया करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
आजच्या शिबिरात, मोर्शी येथील *3* ,  वलगाव येथील *6* आणि अंजनगाव बारी येथील *3*  रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर कॅम्प यशस्वी करण्याकरिता मोर्शी येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री.दिनेश भगत,आरोग्य सहाय्यक श्री जाधव,श्री.विनय शेलुरे, आरोग्य सेवक श्री मंगळे,श्री.बेहरे,सुजित वानखडे वलगाव येथील आरोग्य सहाय्यक श्री भोजराज माहोरे, आरोग्य सेवक श्री नितीन बरडे,श्री. वाली, श्री.चव्हाण, नेरपिंगलाई येथील श्री बाबाराव गवई आरोग्य सहाय्यक,आरोग्यसेवक  श्री. प्रफुल दिवे,श्री.संदीप भोजने, शिराळा येथील श्री.सोमवंशी,  अंजनगाव बारी येथील श्री रामटेके , आरोग्य सहाय्यक श्री मनवर यांनी अथक प्रयत्न केले.
close