सोमनाथ चौधर यांना राष्ट्रीय काँग्रेस शिक्षक सेल अकोला यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित.
निमसाखर एन.ई.एस.हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या संस्था पदाधिकारी, सर्व शिक्षक ,पालक, विद्यार्थी यांनी केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: एन. ई.एस.हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निमसाखर ता. इंदापूर पुणे येथील उपशिक्षक सोमनाथ भानुदास चौधर यांना राष्ट्रीय काँग्रेस शिक्षक सेल अकोला यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अकोला जिल्हा या ठिकाणी पार पडला त्यावेळी राज्यातील शिक्षकांचे काम पाहून विविध जिल्ह्यातील २२ शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार देण्यात आले. शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव झाला पाहिजे त्यांच्या कार्याची दखल घेणे हे आमचे कर्तव्य समजतो व अशा माध्यमातून अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळाली पाहिजे असे मत नाना पटोले यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
त्यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सूर्यकांत रणवरे, उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे, सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवरे, विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थ्यांनी सोमनाथ चौधर यांचे अभिनंदन केले.

