shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

झगडेवाडी गाव हे भविष्यात राळेगणसिद्धी व हिवरे बाजार सारखे निर्माण होण्याच्या दिशेने या गावाची वाटचाल दिसते - तहसीलदार श्रीकांत पाटील.

झगडेवाडी गाव हे भविष्यात राळेगणसिद्धी व हिवरे बाजार सारखे निर्माण होण्याच्या दिशेने या गावाची वाटचाल दिसते - तहसीलदार श्रीकांत पाटील.

 नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवणारी ग्रामपंचायत झगडेवाडी हे तालुक्यातलं पहिलं गाव असेल - गटविकास अधिकारी विजयकुमार परीट.
इंदापूर प्रतिनिधी: झगडेवाडी युवा नेतृत्व  व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत झगडेवाडी च्या आदर्श सरपंच सौ रुपाली अतुल झगडे व शाळा व्यवस्थापन समिती झगडेवाडी चे अध्यक्ष दीपक अभिमन्यू झगडे व अभंग वस्ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश अजिनाथ अभंग यांच्या सहकार्यातून तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे सहशिक्षक यांच्या अनुभवातून दोन्हीही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ग्रामपंचायत कडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षा ह्या ग्रामसेवक धायगुडे , ग्रामपंचायतचे सदस्य डॉ.दादाराम झगडे, श्रीकांत मोरे, जालिंदर बोराटे, सतीश अभंग वि. का. से.स. सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद अभंग तसेच पांडूरंग अभंग, सचिन अभंग यांच्या उपस्थितीत या परीक्षा घेण्यात आल्या. 
ग्रामपंचायतचा यामागचा एकच उद्देश होता मुलांची बौद्धिक पातळी वाढवणे व त्यांना बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहित करणे या परीक्षांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला या कार्यक्रमासाठी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार  श्रीकांत पाटील , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय परीट , पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी खरात  यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.
 यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले, झगडेवाडी गाव हे भविष्यात राळेगणसिद्धी व हिवरे बाजार सारखे निर्माण होण्याच्या दिशेने या गावाची वाटचाल दिसत आहे. 
तसेच असे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवणारी ग्रामपंचायत झगडेवाडी हे तालुक्यातलं पहिलं गाव असेल असे गटविकास अधिकारी परीट  यांनी मनोगत व्यक्त केले .
या उपक्रमाविषयी अतुल झगडे म्हणाले आजचा विद्यार्थी हा माझ्या गावचा उद्याचा सुजान नागरिक बनावा व त्याने वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे झेप घ्यावी यासाठी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे काम आम्ही ग्रामपंचायतच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या व शाळेतील शिक्षकांच्या एकमेकांच्या सहकार्याने करीत आहोत.
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल अभंग यांनी केले तर आभार श्रीराम महाराज अभंग यांनी मानले.
close