shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अद्वयन दत्तात्रय कदम याची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद !! राहुरी तालुक्याच्या सिरपेचात अजून एक मानाचा तुरा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०२२

अद्वयन दत्तात्रय कदम याची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद !! राहुरी तालुक्याच्या सिरपेचात अजून एक मानाचा तुरा..!!

राहुरी : राहुरी येथील अद्वयन दत्तात्रय कदम याची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात तरुण इनलाईन स्केटर म्हणून नोंद झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील श्री दत्तात्रय कदम व कृषी विभागाच्या सौ. सोनाली कदम यांचा हा चिरंजीव. 
अद्वयन याला श्री. ऋषिकेश तारडे यांच्या एरिना स्केटिंग क्लासेसचे विशेष मार्गदर्शन मिळाले. अद्वयन वय ५ वर्षे ४ महिने असून तो तीन वर्षाचा असल्यापासून तो श्री. तारडे सर यांचेकडे स्केटिंग चा सराव करत आहे. लहान वयात अद्वयन ची प्रशिक्षणाची जबाबदारी घेऊन सन्मानयोग्य बनविल्या बदल कदम परिवाराने प्रशिक्षकांचे विशेष आभार मानले.
      त्याने आत्तापर्यंत विविध स्पर्धामध्ये भाग घेतलेला आहे व विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे. आंतराष्ट्रीय स्पर्धेत नाव करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. या छोट्या अद्वयने हा मोठा विक्रम केल्याने त्याने राहुरी तालुक्याचेच नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे नाव उंचविले आहे. 
          अद्वयन हा मोरया इंटरनॅशनल स्कूल मध्ये सिनियर केजीत शिकत आहे. त्याच्या या यशाबद्दल मा.खा. प्रसादराव तनपुरे, मा.डॉ. उषाताई तनपुरे, माजी मंत्री आ. श्री प्राजक्तदादा तनपुरे, मा. अरुण साहेब तनपुरे, आणि मोरया इंटरनॅशनल स्कूलचे, सिनारे मॅडम, प्राचार्य श्री मुसमाडे यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहे. अद्वयन वर राहुरी तालुक्यातील सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600




close