शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२
प्रसादनगर सह डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या सर्व मालमत्तांचा लिलाव स्थगित-तहसीलदार एफ आर शेख..!!
राहुरी : प्रसादनगर सह डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या सर्व मालमत्तांचा लिलाव स्थगित केला असल्याची माहिती राहुरीचे तहसीलदार एफ आर शेख यांनी दिली.
डॉक्टर बा बा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे देणे देण्यासाठी काही मालमत्तांची विक्री करण्याचा निर्णय कारखाना प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार 29 सप्टेंबर रोजी राहुरी तहसील कार्यालयात लिलाव होणार असल्याने व त्या लिलावामध्ये राहुरी कारखाना येथील प्रसाद नगर च्या गट नंबर 542 चा समावेश असल्याने तेथील नागरिक हवालदिल झाले होते. म्हणून त्या नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांचे नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना सदर गट लिलावातून वगळणे साठी विनंती निवेदन दिले. त्याप्रसंगी तहसीलदार शेख बोलत होते.
प्रसादनगरचा गट लिलावातून वगळण्यात यावा यासाठी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे मार्गदर्शनाखाली आप्पासाहेब ढूस यांचे समवेत राहुरी तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी प्रसंगी प्रहार कामगार सेलचे श्रामपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब कराळे, प्रहारच्या राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्ष रजनी कांबळे, प्रहार राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष गणेश भालके, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे, महिला उपाध्यक्ष वंदना कांबळे, अफसाना शेख, प्रहार शाखा उपाध्यक्ष करण सोनवणे, संघटक प्रभाकर कांबळे, पुंड दाजी, तोफिक शेख, अविनाश विधाटे आसाराम आल्हाट, भगवान धिवर, सागर सरोदे शरद लोखंडे, इंदुबाई लोखंडे, सुनील रोकडे, आदेश थोरात, अजय बोर्डे, सचिन वाल्लेकर, अमोल शिरसागर, सुनील सकट, सुभाबाई मोकळ, अलका अल्हाट, शोभा पाटोळे, गायकवाड काकाजी, क्षीरसागर अरुण विधाटे, प्रभाकर मोरे, शकुंतला डुकरे, लक्ष्मीबाई पंडित, अनिता जोगदंड, आशाबाई साळवे, मंदा सोनवणे, आशा सोनटक्के, विजया वानमोडे, हिराबाई आढाव, विमल सरोदे, गंगुबाई मोकळ, शेख दादा मिया, मंगल वाघमारे, विकास जोगदंड, किरण निकाळजे, शिंधू शेलार, राजेंद्र आल्हाट, मारुती खंडागळे, नवनाथ वालेकर, मुक्तार कुरेशी, रामभाऊ राजळे, बापूसाहेब म्हसे, आदींसह प्रसादनगर मधील शेकडो रहिवासी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालय येथे उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना तहसीलदार पुढे म्हणाले की या जागांचे लिलाव स्थगीत करण्यात आले असून त्याबद्दल आपल्या निवेदनाला उत्तर देताना स्वयंस्पष्ट माहिती दिल्या जाईल.
प्रसादनगरचा लिलाव स्थगित झाल्याबद्दल सर्व प्रसादनगर वाशीयांनी टाळ्यांच्या गजरात तहसीलदार यांचे निर्णयाचे स्वागत केले व प्रहारच्या मागणीला मान्यता देऊन तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल तहसीलदार यांचे आभार व्यक्त करून आप्पासाहेब ढूस यांनी सर्व उपस्थित प्रसादनगर वासीयांना धन्यवाद दिले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

