प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २७ / आदिशक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या देवीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. नवरात्रोत्सवाला आज सोमवारपासून सुरूवात होत आहे. राज्यात तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका, हे तीन पूर्ण शक्तिपीठं तर वणीची सप्तशृंगी हे अर्ध शक्तीपीठ मानले जाते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आज घरोघरी घटस्थापना करण्यात येत आहे. स्त्रीला अन्यायाविरोधात लढण्याची शक्ती मिळावी म्हणूनही नऊ रात्री देवीचा जागर करण्यात येतो.
नगर येथील सावेडी उपनगरातील गणपती मंदिरा जवळील गाडेकर चौक येथील नावाजलेल्या निर्मलनगर प्रतिष्ठान येथे सर्व महिला व युवकांच्या नेतृत्वाखाली दि.२६ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी पाथर्डीहून निर्मलनगर असा धावत प्रवास करत तरुण युवकांनी ज्योत आणली . मंडळामार्फत देवीची मुर्ती स्थापना करून घटस्थापना उत्साहाने करण्यात आली.
यावेळी परिसरातील संभाजी गवळी, इरफान शेख , ज्ञानदेव काळे, हिवाळे अंकल,चंद्रकांत वायकर, सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी, युवा नेतृत्व राहुल सांगळे ,संतोष काळे, नितीन काळे, सामाजिक कार्यकर्ते व युवा नेतृत्व बंटी हिवाळे , सुशांत भिंगारदिवे, प्रशांत सदावर्ते , डॉ . ताजवे , भाऊसाहेब मोरे , दिलीप बोंदार्डे , प्रथमेश कोल्हे ,जावेद इनामदार, साजिद इनामदार , लक्ष्मण , अक्षय गांगर्डे ,पप्पु मोरे, गांधले काका, प्रथमेश गटणे, सचिन अकोलकर, दिलीप ठाकूर , अमित काळे, संवेद वायकर , संतोष भराट , अभिषेक खामकर ,सुधीर खामकर तसेच मेरी खंडागळे ,रंजना काळे , पुष्पा वायकर , भराट मावशी , ठाकुर भाभी , सौ .खामकर , वर्षा गवळी , ज्योती पुरी , सोनाली निमसे, शरयु काळे, सेजल काळे,आहिरे मॅडम, गहिले मॅडम आदी महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

