shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खेड सेझ बाधित१५% परतावा धारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!

पुणे:- आजखेड सेझ बाधित१५% परतावा धारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साह पूर्ण वातावरणात संपन्नन झाले.  
" बैठकीला शेतकऱ्यांची लक्षणिय उपस्थिती, बैठकीत घेतले महत्त्वपूर्ण निर्णय!-एम.आय.डी.सी. मार्फतच शासकीय पातळीवर परताव्याचा निर्णयाबाबत शेतकरी ठाम व त्या संदर्भात घेतली सामूहिक शपथ!-के‌डी.एल कंपनीकडून पोस्टद्वारे प्राप्त झालेल्या मतपत्रिकेची केली जाहीर होळी!"

आमदार मेघना साकोरे/ बोर्डीकर यांनी साधला व्हिडिओ कॉल द्वारे शेतकऱ्यांशी संवाद!"
      नुकत्याच वाकडेवाडी, पुणे येथे झालेल्या खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यापुढे नेमकी भूमिका काय ठेवायची यासाठी खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे सभासद१५टक्के परतावाधारक शेतकऱ्यांची बैठक रविवार दिनांक २५/९/२०२२ रोजी केंदूर ता.शिरूर जि. पुणे येथे दत्त मंदिर येथेसंपन्न झाली.
       या बैठकीमध्ये खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या सर्वसाधारण सभेत नेमके काय झाले याच्यावर सविस्तरचर्चा झाली. जबरदस्तीने सभा पार पाडण्याच्या प्रक्रियेचा जाहीर निषेध शेतकऱ्यांनी या बैठकीत केला.
    शासन एम.आय.डी.सी. मार्फत खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या जमिनीचा व्यवहार करण्यास तयार असताना व तसा उद्योग मंत्र्यांनी निर्णय घेतला असताना खाजगी पातळीवर शेअर्स विक्रीचे काही लोकांनी चालवलेली प्रक्रिया याबाबत शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पाठीमागे काहीतरी वेगळा स्वार्थ आहे अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. व प्रक्रियेस तीव्र विरोध करून जाहीर निषेध केला.
        या बैठकीमध्ये खालील महत्त्वपूर्ण गोष्टी ठरविण्यात आल्या!
१) खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरित झालेली जमीन शासकीय पातळीवर एम.आय.डी‌.सी. मार्फतच शेतकरी हिताचा निर्णय घेऊन व्यवहार व्हावा.
२) उद्योग मंत्री, उदय सामंत यांनी नुकत्याच मंत्रालयातझालेल्या बैठकीत के.डी.एल.कंपनीकडे हस्तांतरितझालेल्या जमिनीची खाजगी पातळीवर विक्री न करण्याचा आणिएम.आय.डी‌.सी. मार्फत शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचा शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात येईल असा निर्णय घेतला असताना राजू शेट्टी आणि के.ई. आय.पी.एल. कंपनीशी संबंधित काही लोकांकडून खाजगी पातळीवर शेअर्स विक्रीचे प्रयत्न का होतात?? याच्यावर सविस्तर चर्चा होऊन खाजगी पातळीवर कुठल्याही प्रकारे व्यवहार करायचं नाही याच्यावर शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेऊन निर्णय घेतला.
३) ‌ खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी संदर्भात शेतकरी प्रतिनिधी संचालकांची दुटप्पी भूमिका शेतकऱ्यांना विश्वासात न घेण्याची भूमिका स्वतःच्याच हिताचा विचार करण्याची भूमिका याचा जाहीर निषेध करीत याबाबत जाब विचारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.व शेतकरी प्रतिनिधी बदलण्याबाबत शेतकऱ्यांकडून मागणी होऊन त्याबाबतहीही चर्चा झाली.  
४) नुकत्याच खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीकडून पोस्टद्वारे प्रत्येक सभासदास मतपत्रिका पाठवण्यात आल्याअसून या मतपत्रिकेबाबत सविस्तर चर्चा झाली. असून त्याच्या माठीमागे काहीतरी वेगळे कटकारस्थान असण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात आली. त्यामुळे या मतपत्रिका बाबत कोणीही मतपत्रिका परत पाठवू नये. त्याच्यातून वेगळ्या कारणासाठी त्याचा वापर होऊ शकतो कारण यापूर्वी अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणून याकंपनीकडून आलेल्या मतपत्रिकेची जाहीर होळी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली व कंपनी धोरणाचा निषेध करण्यात आला
५) शासकीय पातळीवर केलेली कंपनीच्या जमिनीच्या विक्री संदर्भात व १५% टक्के परताव्याच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या धोरणावर सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित सामूहिक शपथ घेतली. कोणीही परस्पर शेअर्स विक्री संदर्भात आपल्या शेअर्स पावत्या देणार नाही असा निर्णयही घेण्यात आला.
६) यापुढे एकजुटीने लढा लढून शेतकऱ्यांना योग्य तो निर्णय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
       सदर बैठकीस शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणिय अशी होती१५० पेक्षा अधिक लोक या बैठकीस उपस्थित होते.
        बैठकीमध्ये श्री‌.अॅ .सुनील लिमगुडे, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे,अभिजीत साकोरे,काशिनाथ हजारे, ॲड. अरुण सोनवणे,संतोष दौंडकर, अविनाश दौंडकर, भानुदास नेटके, विश्वास कदम, सुदामराव माशेरे, मोहन दौंडकर, एकनाथ गोरडे, उत्तमराव कान्हुरकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
          बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांना केंदूर गावच्या आमदार मा. मेघना साकोरे/बोर्डीकर यांनी व्हिडिओ कॉल द्वारे शेतकऱ्यांशी संपर्क साधला त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करत असून लवकरच त्याबाबत योग्य निर्णय होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांपुढे व्यक्त केली.
        या बैठकीच्या संयोजनासाठी श्री. बाळासाहेब साकोरे, दत्ता आप्पासाकोरे,विलासनाना थिटे, श्री‌ अमित खरपुडे, दादाभाऊ जैद, नवनाथ दौंडकर, एकनाथ दौंडकर,दत्तात्रय नेटके, ऋषिकेश चव्हाण, निलेश म्हसाडे, ओंकार कान्हुरकर, आतिष कान्हुरकर, भीमसेन गोरडे, ज्ञानेश्वर गोगावले, विठ्ठल दौंडकर, गुलाबराव हजारे, सहदेव हजारे, यांनी मोलाचे योगदान दिले.
close